Cabinet Expansion News: शिंदे फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? 'ही' मोठी अपडेट समोर

Maharashtra Politics : शिंदे गटातील नेत्यांसह भाजपमधीलही अनेक जण मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत.
Eknath Shinde - Devandra Fadnavis
Eknath Shinde - Devandra FadnavisSarkarnama

Shinde Fadnavis Government Cabinet Expansion : राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येऊन सहा महिने उलटले आहे. तरीही या नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर तारीख पे तारीख दिली जात आहे. यावरुन विरोधकांकडून सातत्याने सरकारवर जोरदार टीकाही केली जात आहे. मात्र. आता मंत्रिमंडळ विस्तारावर मोठी अपडेट समोर आली आहे.

शिंदे गटातील नेत्यांसह भाजपमधीलही अनेक जण मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करताना शिंदे फडणवीसांची मोठी कसरत होणार आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळणार्या आमदारांची नाराजी दूर करण्याचं एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

Eknath Shinde - Devandra Fadnavis
Supriya Sule News: काँग्रेस प्रणित सरकार सत्तेत आल्यावर गडकरींचं मंत्री पद कायम ठेवणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (दि.२४) दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून त्यात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात महापालिका निवडणूका होणार आहे. यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत केद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला दोन मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde - Devandra Fadnavis
Delhi MCD Mayor Election : दिल्ली MCD महापौरपदाची आज निवडणूक, आप-भाजप मैदानात

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यात आणि केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर 30 जानेवारीनंतर निर्णय देण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com