Cabinet Expansion : दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी? भाजप नेत्याने स्पष्टचं सांगितलं...

Cabinet Expansion | शिंदे आणि फडणवीस गटाकडून १८ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी देण्यात आली होती.
Cabinet Expansion |
Cabinet Expansion |

मुंबई : राज्यात एक महिन्यापूर्वी शिंदे-फडवणीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिंदे (Eknath Shinde) आणि फडणवीस गटाकडून १८ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी देण्यात आली होती. तर पहिल्या विस्तारात संधी न मिळाल्याने शिंदे आणि भाजपतील (BJP) काही आमदार नाराज झाल्याचेही बोलले जात होते. मात्र आता पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सूचक विधान केलं आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा दूसरा विस्तार होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या या दुसऱ्या विस्तारात आता कोणाला संधी मिळणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Cabinet Expansion |
अमित शहा - राज ठाकरे भेटीची शक्यता : भाजप मनसे युतीचे संकेत

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यामध्ये ४३ मंत्री असतात. सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह शिवसेना-भाजपाचे मिळून प्रत्येकी ९ असे २० मंत्री सध्या मंत्रिमंडळात आहेत. आता उर्वरित २३ मंत्र्यांचाही लवकरच मंत्रिमंडळात समावेश होईल. महाराष्ट्रात सध्या २८८ मतदारसंघ आहेत. ४३ मंत्र्यांपैकी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह २० मंत्री सध्या राज्याचा कारभार पाहत आहेत. लवकरत इतर २३ मंत्र्यांचा विस्तार केला जाईल.

“येत्या काही दिवसांतच दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होईल. यात शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांना संधी मिळेल. पण हा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे मुनगंटीवार यांनी अद्यापही स्पष्ट केलेलं नाही. तरी दसऱ्याच्या दरम्यान हा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतल्यानंतर तब्बल ४० दिवसांनी शिंदे-फडणवीसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. त्यात शिंदे आणि फडणवीस गटाकडून १८ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी देण्यात आली होती. पहिल्या विस्तारात संधी न मिळाल्याने शिंदे आणि भाजपमधील काही आमदार नाराज झाले आहेत. शिंदे गटातील आमदारांनी ती बोलून दाखवली होती. भाजपच्या आमदारांनी मात्र पक्षादेशाच्या नावाखाली शांत राहणे पसंत केले होते. आता या नाराज आमदारांना खूष करण्यासाठी दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे.

"दुसऱ्या टप्प्यात सात कॅबिनेट तर 17 राज्यमंत्र्यांचा विस्तार होणार आहेत. मंत्रीमंडळ विस्तार पुढच्या दोन महिन्यात म्हणजे दिवाळीपूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे," शिंदे-फडणवीस सरकारमध्ये २६ कॅबिनेट आणि १७ राज्यमंत्री असतील. दुसऱ्या टप्प्यात सात कॅबिनेट तर १७ राज्यमंत्र्यांचा विस्तार होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणाला संधी देण्यात येते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in