Dipali Sayyad : दिपाली सय्यद दोन महिन्यांपासून वेटिंगवर; शिंदे गटातला प्रवेश कुठे अडला?

Dipali Sayyad News : दोन महिन्यापासून दिपाली सय्यद यांच्या प्रवेशाला मुहूर्त लागला नाही.
Dipali Sayeed
Dipali Sayeed Sarkarnama

मुंबई : अभिनेत्री दिपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याबाबत काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: माहिती दिली होती. 'एकनाथ शिंदे यांनी मला राजकारणात आणलं. आता ते जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारेल', असं त्या म्हणाल्या होत्या. मात्र त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश नेमकं कधी? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय दिपाली सय्यद यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी लवकरच शिंदे गटात प्रवेश होईल असं 9 नोव्हेंबरला सांगितलं होतं. मात्र दोन महिने उलटले तरी देखील दिपाली सय्यद यांचा प्रवेश अद्याप झालेला नाही. त्यामुळे त्यांचा प्रवेश नेमकं कुठे अडला? जवळपास दोन महिने उलटले तरीही शिंदे गटात प्रवेश न झाल्याने त्यांना वेटिंगवर तर ठेवण्यात आलं नाही ना? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

Dipali Sayeed
Aurangabad : कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पिळवणुकीविरोधात एमआयएम रस्त्यावर

तसेच शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे एकत्र येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दिपाली सय्यद यांनी म्हटलं होतं. मात्र काही दिवसांनी सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षात आणलं.

त्यानंतर मात्र दिपाली सय्यद या नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर त्यांनी शिंदे गटात जाण्याची घोषणा केली होती. ठाण्यातील टेंभीनाका या ठिकाणी त्यांचा जाहीर पक्षप्रवेश होणार होता. मात्र दोन महिन्यांपासून त्यांचा प्रवेश रखडला असून त्या अद्याप वेटिंगवरच आहेत.

Dipali Sayeed
Winter Session : गायरान जमीन, कृषी महोत्सव वसुलीचे आरोप, तरीही सत्तारभाई एकदम ओक्के..

दिपाली सय्यद यांच्या प्रवेशाला भाजपचा विरोध?

दिपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मात्र सय्यद यांना शिंदे गटात घेण्यासाठी भाजपच्या महिला आघाडीने विरोध दर्शवला होता. दिपाली सय्यद यांनी आधी महिला मोर्चातील पदाधिकाऱ्यांवरील तक्रारी मागे घ्याव्यात, तसेच त्यांनी पंतप्रधान, उपमुख्यमंत्र्यांची माफी मागावी. अन्यथा त्यांच्या पक्षप्रवेशाला आमचा विरोध असेल, असे भाजप महिला मोर्चाच्या एका महिला पदाधिकाऱ्यानी ठणकावून सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाला भाजपचा तर विरोध नाही ना? अशी चर्चा देखील रंगली आहे.

Dipali Sayeed
‘ते भरत गोगावले माझ्याकडून बघून सारख्या मिशा पिळत असतात’

दरम्यान, दोन महिन्यापासून दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांच्या प्रवेशाला मुहूर्त लागला नाही. त्यामुळे त्यांचा शिंदे गटात प्रवेश नेमकं कधी होणार? की भाजपच्या (BJP) विरोधामुळे त्यांचा प्रवेश अडला तर नाही ना? प्रवेशासाठी त्यांना अजून किती दिवस वाट पाहावी लागणार? असे अनेक प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com