उषःकाल होता होता काळरात्र झाली...अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...

Shivsena : उद्धव ठाकरेंना हे चिन्ह मिळाल्यावर अनेकांच्या तोंडी हे गाणं येत आहे.
Shivsena, Election Latest News
Shivsena, Election Latest NewsSarkarnama

पुणे : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच नाव तात्पुरत गोठवण्यात आल्याने अंधेरी पोट निवडणूकीसाठी शिवसेना आणि शिंदे गटांकडून नवीन चिन्ह आणि नवीन नावे निवडणूक आयोगाकडे सुचवण्यात आली होती. यावर आता आयोगांनी निर्णय दिला असून उद्धव ठाकरे यांना 'मशाल' चिन्ह मिळालं असून शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) असे नाव दिले आहे.

तर शिंदे गटाला नवीन तीन पर्यांय सुचवायला सांगितले असून बाळासाहेबांची शिवसेना असे नाव त्यांना दिलं आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या 'मशाल' या चिन्हावरून सोशल मीडियावर उषःकाल होता होता काळरात्र झाली...अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या कवितेच्या ओळी अनेकांच्या तोंडून गुणगुणली जावू लागली आहे. (Shivsena, Election Latest News)

Shivsena, Election Latest News
मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळालं... आणि नावं...

उषःकाल होता होता काळरात्र झाली...अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.. सुरेश भट यांची ही कविता सिंहासन या मराठी चित्रपटात स्वरबद्ध करण्यात आलं होती. या चित्रपटातून देखील राजकारणाचं वास्तव दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटात मुख्य भूमिका ही निळू फुले यांनी साकारली आहे. यामुळे सध्याच सुरू असलेलं राजकारण बघता ठाकरेंना हे चिन्ह मिळाल्यावर अनेकांच्या तोंडून नकळतपणे हे गाणं येत आहे. तर अनेक शिवसैनिकांनी या कवितेच्या ओळी आणि गाण्याच्या रिल्स बनवून सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.

हे गाण भावनिक असून थेट काळजाला भिडणार असल्याने हे गाणं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रचार गित म्हणूनही वापरलं जावू शकत,अशी शक्यता अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.

Shivsena, Election Latest News
क्रिकेटच्या मैदानात शरद पवार आणि शेलार एकाच टीममध्ये...

दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी निवडणुक आयोगाला तीन नावे आणि चिन्हांचे पर्याय दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील निवडणूक आयोगाला तीन नावे आणि तीन चिन्हे सादर करण्यात आली होती. यामध्ये शिंदे यांनीही ठाकरे यांच्याप्रमाणे त्रिशूळ आणि उगवत्या सूर्याची मागणी केली होती. तर तिसरा पर्याय म्हणून गदा देण्यात आली होती. नावातही शिंदे यांनी बाळासाहेबांचे नाव दिले होते. त्यामुळे कोणते नाव कुणाला मिळते, याबाबत उत्सुकता लागली होती.

Shivsena, Election Latest News
राज्यातील दहा जिल्हे खवळले; राज्य सरकारकडे सादर करणार 'हे' १६ मुद्दे

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाकडून पक्षाच्या नावाचे तीन पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केले होते. त्यात शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची या नावांचा समावेश होता त्यापैकी बाळासाहेबांची शिवसेना हे नाव त्यांना मिळालं आहे. तर शिंदे यांनी निवडणूक चिन्हासाठी त्रिशूल, उगवता सूर्य आणि गदा हे तीन पर्याय निवडणूक आयोगाला सादर केले होते त्यापैकी कुठलेही चिन्ह त्यांना मिळालं नसून नवीन चिन्ह सुचवायला सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in