Death Threat to Sharad Pawar : पवार विरोधात असतात तेव्हा दंगली घडतात; दरेकरांचा गंभीर आरोप

Pravin Darekar on Sharad Pawar : फडणवीसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न
Sharad Pawar, Pravin Darekar
Sharad Pawar, Pravin DarekarSarkarnama

Maharashtra Politics : राज्यातील छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरनंतर कोल्हापूर येथे दंगलीचा प्रकार घडला. यामुळे राज्य अशांत असताना त्यातत शुक्रवारी (ता. ९) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 'राजकारण महाराष्ट्राचं' नावाच्या ट्विटर अकाऊंटवर ही धमकी दिली आहे.

या धमकीनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही नेत्याला धमकी दिल्याचे सहन करणार नसल्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar, Pravin Darekar
Death Threat To Sharad Pawar: मोठी बातमी: शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, सुप्रिया सुळेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

पवार सत्तेबाहेर असतात त्यावेळी दंगली घडल्याचा आरोप दरेकर यांनी केली आहे. दरेकर म्हणाले, "आता सर्वच प्रकरणांची चौकशी होणे गरजेचे आहे. जेव्हा जेव्हा शरद पवार (Sharad Pawar) किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेबाहेर राहिला तेव्हाच या राज्यात अनेक दंगली झाल्याचा इतिहास या महाराष्ट्राने (Maharashtra) पाहिला."

यानंतर प्रवीण दरेकर यांनी (Pravin Darekar) त्यांनी तसेच भाजप अशा प्रकारांना खतपाणी घालत नाही, असा दावाही केला. ते म्हणाले, "एक गोष्ट सत्य आहे की भाजप (BJP) सत्तेत असताना दंगली होणे किंवा शांतता भंग होणे अशा गोष्टी कधीच होऊ शकत नाही. सत्ताधारी पक्ष अशा गोष्टींना खतपाणी घातल नसतो आणि घालायचे काही कारण नाही. मग खरेच या दंगली राजकीय उद्देशाने प्ररीत होऊन घडवून आणतेय का याची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे."

Sharad Pawar, Pravin Darekar
Sharad Pawar Death Threat: शरद पवारांना धमकी देणारा कोण?; 'धर्मनिरपेक्षतेचा द्वेष करतो..'

दंगली घडवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रतिमा मलिन करण्याच षडयंत्र असल्याचा आरोप दरेकरांनी केला. ते म्हणाले, "राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याचे केविलवाणे आणि दुर्दैवी प्रकार सध्या सुरू आहे. देवेंद्र फडणवीस मात्र अशा गोष्टींची पर्वा करत नाही. ते कठोर आहेत. ते कारवाई करण्याबाबत कुणाचीही तमा बाळगणार नाहीत. या राज्यातील कायदा सुव्यवस्था ते अजिबात बिघडवू देणार नाहीत."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in