CM Eknath  Shinde|
CM Eknath Shinde|

राऊतांच्या घरी सापडलेल्या पैशांबाबत विचारताच मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर देणं टाळलं...

CM Eknath Shinde| Sanjay Rauat| संजय राऊत यांच्या घरी जी रोख रक्कम सापडली होती त्यात १० लाखांच्या रकमेवर एकनाथ शिंदे यांचे नाव होते

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी (31 जुलै) अटक केली. संजय राऊत यांना सोमवारी विशेष ‘ईडी’ न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावण्यात आली. तपास करताना तपास अधिकाऱ्यांना संजय राऊत यांच्या घऱी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली होती. त्यापैकी दहा लाखांच्या नोटांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख आढळून आल्याची माहिती समोर आली होती.

त्यावर एकनाथ शिंदे यांच्याकडे पुण्यात प्रसारमाध्यमांनी प्रश्न उपस्थित केले. जय राऊत यांच्या घरी सापडलेल्या पैशांवर तुमचं नाव कसं आलं यासंबंधी चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले “माझी चौकशी करण्यापेक्षा, ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणी संजय राऊतांची चौकशी सुरु आहे. त्यातून लवकरच सत्य समोर येईल, असे सांगत त्यांनी त्यावर जास्त भाष्य करणं टाळलं.

ईडीच्या पथकाने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर छापेमारी केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या घराबाहेर केंद्रीय राखीव पोलीस दलही (सीआयपीएफ) जवानही तैनात करण्यात आले होते. याशिवाय त्यांच्या दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही ‘ईडी’कडून छापेमारी करण्यात आली. तब्बल नऊ तास चाललेल्या या चौकशी आणि छापेमारीदरम्यान ईडी अधिकाऱ्यांना राऊतांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली. यामधील १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटांवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव होतं. त्यावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख करण्यात आला होता.

दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी याबाबत भूमिका मांडली. “एकनाथ शिंदेंच्या विरोधात काही करायचं असेल असेल तर त्यासाठी ते पैसे राखीव ठेवले असल्याची शक्यता आहे. प्रत्येक पैशाचा स्त्रोत दाखवावा लागतो आणि तो संजय राऊतांकडे असणार. राऊत हुशार, बुद्धिमान असल्याने मुद्दाम असं काही लिहिणार नाहीत. एकनाथ शिंदेंचा या पैशांशी काही संबंध नाही. आम्ही गुवाहाटीला असताना आमदारांना पैसे दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर आम्ही त्यांना आमची घरं तपासून पाहा, पैसै सापडणार नाहीत असंही म्हटलं होत. कारण आम्ही पैशांसाठी हा उठाव केला नव्हता,” असं स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com