Thackeray- Shinde Politics : 'जगात जे काही घडतयं, ते सरकार आल्यामुळेच'

Thackeray- Shinde Politics| भारताने मेलबर्न जिंकले याचे संपूर्ण श्रेय मिंधे व फडणवीस यांनाच द्यावे लागेल.
Eknath Shinde and Devendra Fadanvis
Eknath Shinde and Devendra FadanvisSarkarnama

Maharashtra Politics : मुंबई : सध्या राज्यात जे बरे घडते आहे ते फक्त तीन महिन्यांपूर्वी जो सामना मिंधे गटाने जिंकला त्यामुळेच. अशा शब्दांत शिवसेनेच्या ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. भारताने मेलबर्न जिंकले याचे संपूर्ण श्रेय मिंधे व फडणवीस यांनाच द्यावे लागेल. जगात सर्व काही घडते आहे ते त्यांचे सरकार आल्यामुळेच. अशी उपहासात्मक टीकाही शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान सामन्याचे उदाहरण देत उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांवर टीका केली आहे. 'ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील भारत-पाक क्रिकेट सामना आपण जिंकू शकलो. विराट कोहलीने एकदम धुवाधार फटकेबाजी केली. त्यामुळे हा सामना भारताने जिंकला, पण महाराष्ट्रात मिंधे गटाने तीन महिन्यांपूर्वी ‘सामना’ जिंकून जगात चैतन्य पर्व निर्माण केले नसते तर भारतीय क्रिकेटपटूंच्या ‘बॅटी’ होळीत टाकण्याच्या लायकीच्याही राहिल्या नसत्या, असा टोला ठाकरेंनी लगावला आहे.

भारताने मेलबर्न जिंकले याचे संपूर्ण श्रेय मिंधे व फडणवीस यांनाच द्यावे लागेल. जगात सर्व काही घडते आहे ते त्यांचे सरकार आल्यामुळेच. ज्या ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीच मावळत नव्हता, ज्या ब्रिटिश साम्राज्याने आमच्यावर दीडशे वर्षे राज्य करून आम्हाला गुलाम करून ठेवले, त्या ब्रिटनवर आता एका भारतीय वंशाच्या तरुण पंतप्रधानांचे राज्य आले. ऋषी सुनक या भारतीय वंशाच्या तरुणाची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली. हा नवा इतिहास रचला गेला तो कोणामुळे? अर्थात आपले पंतप्रधान मोदी व महाराष्ट्रातील मिंधे-फडणवीस यांच्या सरकारमुळे. अशी घणाघाती टीकाही शिवसेनेने केली आहे.

त्याचवेळी त्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही निशाणा साधला आहे. '' मुख्यमंत्री एकीकडे 30 लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत दिली, निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही 755 कोटींचे अर्थसहाय्य केले असे ‘बुडबुडे’ सोडत आहेत तर तिकडे त्यांचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार बीडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यात दारूचे ‘थेंब’ उडवीत आहेत.जिल्हाधिकाऱ्यांशी दारूगप्पा मारीत आहेत, असही शिवसेनेने म्हटलं आहे.

तर, दूसरीकडे, उद्ध्वस्त शेतकरी ‘मदत देता का, मदत?’ असा टाहो सरकारकडे फोडीत आहे आणि राज्याचे कृषीमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू घेता का, दारू?’असा प्रश्न करीत आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या घरचे दिवे अजूनही विझलेलेच का आहेत, याचे उत्तर कृषीमंत्र्यांच्या या प्रश्नात दडलेले आहे. असही शिवसेनेने म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com