Shivsena|काहीही झालं तरी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावरच होणार: सुनील प्रभुंनी ठणकावलं

Sunil Prabhu| २१ तारखेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्या आधी उद्धव ठाकरेंच्या उपस्थिती आज बैठक पार पडली.
Sunil Prabhu|
Sunil Prabhu|

मुंबई : दसरा मेळाव्यावरुन शिवसेना (Shivsena) शिंदे गटातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा? याबाबत अद्यापही परिस्थिती जैसे थे तशीच आहे. त्याआधी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज विभागप्रमुखांची बैठक पार पडली.

दसरा मेळाव्या आधी येत्या २१ सप्टेंबरला गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहेत. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ''शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवतिर्थावरच शिवसेनाचा दसरा मेळावा होतो, बाळासाहेबांपासून ही परंपरा चालत आली आहे. ही शिवसेनेची संस्कृती आहे. रितसर परवानगीसाठी जे करावं लागेल ते आम्ही करत आहोत. इथे संस्कृती जपली जाते. त्यामुळे काहीही झालं तरी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावरच होणार आणि आम्हाला ही परवानगी मिळालीच पाहिजे, असा विश्वास शिवसेना नेते सुनील प्रभु यांनी व्यक्त केला आहे.

Sunil Prabhu|
BJP Politics|वेदांतासाठी किती टक्केवारी मागितली होती? शेलारांचे शिवसेनेवर गंभीर आरोप

तसेच, विभाग प्रमुखांशी संवाद साधला असता म्हणाले की, २१ सप्टेंबरला होणाऱ्या मेळाव्याबाबत बैठकीत चर्चा झाली. शिवतिर्थावरच शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, असा विश्वास विभागप्रमुख मंगेश सातमकर यांनी व्यक्त केला. दरम्यान शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीची लेखी माहिती द्या, असे पत्र शिवसेनेने महापालिकेला पाठवले आहे.

शिवसेनेची अनेक वर्षांची परंपरा खंडीत करुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर दसरा मेळाव्यावरुनही कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु आहे. शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. मात्र, दसरा मेळाव्यासाठी ठाकरे यांना अजूनही परवानगी मिळालेली नाही.

दोन्ही गटांमध्ये शिवतिर्थावरील दसरा मेळाव्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. त्यामुळे दसरा मेळावा होणार की नाही? झाला तर तो कोण घेणार असे एक ना अनेक प्रश्न शिवसैनिकांच्या मनात आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे दसरा मेळ्यावरुन राजकीय कुरघोडी सुरु झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीमुळे दसरा मेळाव्याला महत्व प्राप्त झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com