सदाभाऊ खोत आता काय करणार?

Vidhana Parishad Elelction 2022| Sadabhau Khot| निवडणूक बिनविरोध करायची असेल तर काँग्रेसला एक उमेदवार आणि भाजपला सदाभाऊ खोत अर्ज मागे घ्यावा लागेल, असे सांगण्यात येत आहे.
सदाभाऊ खोत आता काय करणार?
Sadabhau Khot

Vidhan Parishad Elelction 2022

मुंबई : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दहा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर विधान परिषदेसाठी भाजप ची तयारी सुरु झाली आहे.

या पार्श्वभूमीवर विधान परिषदेबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची बैठक होणार आहे. असे असतानाच भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जवळपास 15 मिनिट दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली असून, फडणवीस यांनी त्यांना सध्या भाजप ऑफिसला बसायला सांगितले आहे. त्यामुळे सदाभाऊ आता काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता भाजपने ६ जागा लढण्यावर ठाम आहे. पण अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीसच घेतली, असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

Sadabhau Khot
दरेकरांच्या संपत्तीत दुपटीने वाढ; 'मजूर' वादानंतर उमेदवारी अर्जात व्यावसायिक म्हणून नोंद

भाजपने सहाव्या जागेसाठी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत यांना मैदानात उतरवलं आहे. एका जागेसाठी 27 मतांचा कोटा आहे. भाजपचे संख्याबळ पाहता चार उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. पण त्यानंतरही भाजपने सहा उमेदवार दिले आहेत.

काँग्रेसने एक उमेदवारी अर्ज मागे घेतला तरी भाजप सदाभाऊ खोत यांना माघार घेण्यास सांगणार का, हाही प्रश्न आहे. सदाभाऊ यांनी माघार घेतली तरच ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. अन्यथा या निवडणुकीतही चुरस वाढणार आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या भूमिकांकडे लक्ष लागले आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला आता विधान परिषद निवडणुकीचं गणित सतावू लागलं आहे. या निवडणुकीतही आकडे भाजपच्या बाजूने नसले तरी सहा उमेदवार देण्यात आले आहेत. तर आघाडीचेही सहा उमेदवार रिंगणात आहेत. असे असताना निवडणूक बिनविरोध करायची असेल तर काँग्रेसला एक उमेदवार आणि भाजपला सदाभाऊ खोत अर्ज मागे घ्यावा लागेल, असे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in