Mahavikas Aghadi News: महाविकास आघाडीने पुन्हा 'वज्रमूठ' आवळली; थांबलेल्या सभा पुन्हा होणार!

Political News: महाविकास आघाडीच्या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत काय ठरलं?
Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi Sarkarnama

Mumbai : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला. तर भाजपचा सत्ता राखण्यात यश आलं नाही. या विजयानंतर आता काँग्रेससह विरोधकांना मोठं बळ मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्टात देखील राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत तसेच वज्रमूठ सभेबद्दल चर्चा झाली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

Mahavikas Aghadi
MVA News : कर्नाटकच्या निकालानंतर महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग,पवारांनी बोलावली आघाडीची तातडीची बैठक

जयंत पाटील म्हणाले, "आजच्या बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेलं यश आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबद्दलचा सुप्रिम कोर्टाने दिलेला निकाल याविषयी चर्चा झाली. याबरोबरच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याला आम्ही ठोस पर्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत", असं ते म्हणाले.

Mahavikas Aghadi
MNS News : राज ठाकरेंनी भाकरी फिरवली; दौऱ्यादरम्यानच घेतला मोठा निर्णय

"कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचा आजच्या बैठकीत आम्ही आढावा घेतला. कर्नाटकमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. महाराष्ट्रातील जनतेला सक्षम पर्याय देण्यावर महाविकास आघाडीमध्ये एकमत झालं आहे. आघाडीतील तिन्हीही पक्ष एकसंधपणे लढणार आहोत. आगामी निवडणुकीतील जागावाटपासंदर्भात आमच्यासोबतच्या घटक पक्षांबरोबर देखील चर्चा करणार आहोत", असं जयंत पाटील म्हणाले.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com