अडीच वर्षात ठाकरे सरकारने जे लुटले, त्याचा हिशोब द्यावा लागणार...किरीट सोमय्या

सोमय्या Kirit Somayya म्हणाले, उद्धव ठाकरेंसमोर udhav thackeray ते सर्वजण खोटं बोलू शकतात. पण मी सगळे पुरावे दिले असून या सगळ्या प्रकरणाचा सव्वा वर्षे पाठपूरावा केलाय. पोलिसांवर मुख्यमंत्री ठाकरेंचा दबाव असला तरी ते न्यायालयास Court व ईडीला ED दाबू शकणार नाहीत.
Kirit Somayya
Kirit Somayyasarkarnama

मुंबई ः कोविड हॉस्पिटल घोटाळ्यात त्या हॉस्पिटलसमोर असलेल्या चहावाल्याच्या दुसऱ्या कंपनीत संजय कदम पार्टनर आहेत. अडीच वर्षात ठाकरे सरकार व ठाकरे परिवाराने जे लुटले आहे, त्याचा हिशोब त्यांना द्यावा लागणार आहे, असा इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

किरीट सोमय्यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या नेत्यांवर घाणाघाती टीका केली. ते म्हणाले, संजय कदम हे अनिल परब यांचा उजवा हात आहेत. संजय कदम यांची पार्टनरशीप कोविड हॉस्पिटल घोटाळ्याच्या कंपनीत आहेत. संजय कदमांचे थेट भागीदार, जोडीदार असून ते संजय राऊत व परबांचेही आहेत. आयटीची रेड पडली तेव्हा संजय कदमांकडे करोडो रुपये सापडले होते. एसआरए, केबलचा व्यवसाय असे त्यांचे अनेक उद्योग धंदे आहेत.

Kirit Somayya
Video: चार वर्ष रेसॉर्टचा कर कसा भरला?; किरीट सोमैय्या

कोविड हॉस्पिटल घोटाळा झाला होता, त्या हॉस्पिटलच्या समोर असलेल्या चहावाल्याच्या दुसऱ्या कंपनीत संजय कदम पार्टनर आहेत. अडीच वर्षात ठाकरे सरकार व परिवाराने लुटले आहे, त्याचा हिशोब त्यांना द्यावा लागणार आहे. कोविड हॉस्पिटल घोटाळ्यात संजय राऊतचे जोडीदार सुजित काटकर यांच्या कंपनीतील चहावाला यांच्यासोबत संजय कदम आणि अनिल परब हे पार्टनर आहेत. किरिट सोमय्यांची सुपारी घेऊन हत्या करण्याचा प्लॅन होता, ही सगळी मंडळी एकच आहेत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

Kirit Somayya
Video: अनिल परब यांच्या पापाचा घडा भरला ते जेल मध्ये जातील; रवी राणा

सुजित काटकर यांच्याबाबत अनिल परब हे दिशाभूल करत आहेत. पण त्यांची जेलवारी पक्की आहे. इडीच्या हाती सगळी माहिती आलेली आहे. तरीही तांत्रिक बाबीत माझे नाव दाखल झाले नाही असं अनिल परबांनी म्हणलंय. यावर श्री सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरेंसमोर ते सर्वजण खोटं बोलू शकतात. पण मी सगळे पुरावे दिले आहेत. या सगळ्या प्रकरणाचा सव्वा वर्षे पाठपूरावा केलाय, पोलिसांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दबाव असला तरी ते न्यायालयास व ईडीला दाबू शकणार नाहीत.

Kirit Somayya
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात येऊन शाहू महाराजांची भेट घेणार!

अनिल परब कसे घोटाळे करतात याचे एक खरेदीपत्र दाखवत सोमय्या म्हणाले, दोन मे २०१७ मध्ये शेत जमीन त्यांनी घेतली. त्यावेळी त्याचे ५७ लाख २० हजार रूपये मुल्यांकन झाले. तीच जमीन २५ कोटींचा हिशोब बांधून अनिल परबने सदानंद कदमला विकली. त्यावेळी त्याचे मुल्यांकन ६० लाख आहे. त्यावेळी अनिल परब टॅक्स भरत होते आता सदानंद कदम टॅक्स भरत आहेत. त्याची मी तक्रार केली होती.

Kirit Somayya
उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार सातारा जिल्ह्याला जाहीर

अनिल परब यांनी याची खोटी माहिती दिली. ५० लाखांचे दोन चेक मिळालेत. बँकेत चौकशी केल्यानंतर कळाले की, ॲग्रीमेटच्या अनेक महिन्यानंतर पुन्हा ॲग्रीमेंट केले. हे सर्व रद्द होणार आहे. याची सर्व माहिती मी न्यायालयात दिली आहे. रत्नागिरीच्या अधिकाऱ्याने कबुल केले की हे पैसेच दिलेले नाहीत. तसे असेल तर ते ॲग्रीमेंट रद्द होणार असून अनिल परब यांना जेल होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com