Ajit Doval यांच्या अचानक मुंबई दौऱ्यामागचं कारण काय?

Ajit Doval | विशेष म्हणजे अजित डोवाल यांच्या मुंबई दौऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती.
Ajit Doval | CM Eknath Shinde
Ajit Doval | CM Eknath Shinde

मुंबई : महाराष्ट्रासह राजधानी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ला आणि घातपाताच्या धमक्या येत आहेत. असे असताना देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल Ajit Doval) यांनीदेखील या धमक्यांची गंभीर दखल घेतल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे आज सकाळीच अजित डोवाल मुंबईत दाखल झाले. सकाळपासून त्यांनी बड्या नेत्यांच्या भेटीगाठींचा सपाटा लावला आहे. मुंबईत पोहचताच त्यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadanvis) भेट घेतली.

त्यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले. त्यानतंर आता त्यांनी मुंबईचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचीही पोलीस आयुक्तालयात भेट घेतली. मुंबईला येणाऱ्या धमक्या पाहता अजित डोवाल आज दिवसभर विविध आयपीएस अधिकऱ्यांनाही भेटणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Ajit Doval | CM Eknath Shinde
आता काही शो मॅन आता झालेत; Ajit Pawar यांचा निशाणा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी डोवाल मुंबईत आले असल्याचीही शक्यता आहे. सण-उत्सवाच्या काळात भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये काही घातपाताच्या धमक्या आल्याने मुंबई आणि महाराष्ट्राबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अजित डोवाल यांची सुरक्षेबाबत चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई पोलिसांना दहशतवादी कारवाया आणि धमकीचे फोन आले आहेत. रायगडच्या समुद्रकिनारी अज्ञात बोटीत एके-४७ बंदुकाही आढळून आल्या होत्या. या संपूर्ण घटनाक्रमांची माहिती घेण्यासाठी अजित डोवाल मुंबईत आल्याचं बोललं जात आहे. विशेष बाब म्हणजे अजित डोवाल यांच्या मुंबई दौऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. त्याचे दिवसभराचे कार्यक्रमची जाहीर करण्यात आले नव्हते.

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षात पाकिस्तानमधून धमकीचा संदेश आला होता, ज्यामध्ये देशातील दहा लोकांच्या मदतीने २६/११च्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची योजना असल्याचे सांगण्यात आले होते. त्या संदेशात देशातील दहा क्रमांकही पाठवण्यात आले होते. मुंबईवर पुन्हा एकदा सोमालियासारखा दहशतवादी हल्ला केला जाऊ शकतो, अशी धमकीही देण्यात आली होती. या सर्व सुरक्षेशी निगडित प्रश्न पाहता अजित डोवाल यांच्या मुंबई दौऱ्याचे महत्त्व समजू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in