'शिवरायांबद्दल भाजपला नक्की खुपतयं तरी काय?'

Amol Kolhe | भाजपने शिवरायांबद्दल आपली नेमकी भूमिका काय ती स्पष्ट करावी आणि महाराष्ट्राची अस्मिता दुखावल्याबद्दल संपुर्ण राज्याची माफी मागावी.
Amol Kolhe
Amol Kolhe

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली, असं उद्वेकजनक वक्तव्य केलं आणि मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. नेमक काय खुपतय काय तुम्हाला? कधी भाजपचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ता बोलतात, कधी राज्यपाल बोलता, अशी बेताल वक्तव्य का केली जातात, नक्की काय खुपतयं तुम्हाला, असा संतप्त सवाल खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यात उमटायला सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेने राज्यपालांचा या विधानावरुन राजकारण तापलं आहे. अशातच अमोल कोल्हे यांनी राज्यपाल आणि सुधांशु त्रिवेदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Amol Kolhe
छत्रपतींबद्दल अवमानकारक बोलताना राज्यपालांची जीभ झडली कशी नाही? : काँग्रेसचा संतप्त सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ असू नये तर धर्मसत्ता ही राजसत्ता यांनी हातात हात घालुन लोक कल्याणाचं काम करावं हा आदर्श घालु दिला, हा तुम्हाला खुपतोय. महाराजांनी माणुस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे, हे वास्तव अधोरेखित केलं हे तुम्हाला खुपतय, अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांना एका उदात्त ध्येय्यासाठी कसंं प्रेरित केलं जाऊ शकतं, हे उदारण या मातीत घालुन दिलं हे तुम्हाला खुपतयं की, महाराजांनी सर्वसामान्य माणसाच्या हक्काचं राज्य, रयतेच राज्य, आपलं स्वराज्य कसं असाव, याचा वस्तुपाठ घालुन दिला, हे तुम्हाला खुपतंय, नक्की खुपतय काय तुम्हाला हाच नेमका प्रश्न आहे.

ज्या शिवाजी महाराजांच्या गिनीमी काव्याचं कौतुक जगभरातील राज्यकर्ते करतात, तो गनिमी कावा तुम्हाला समजु नये, जर समजलं नसेल तर तुम्हाला काही पुस्तक पाठवतो किंवा नुकत्याच आलेल्या शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाची लिंक पाठवतो, तुम्हाला कळेल, की जेव्हा अखंड हिंदुस्तानातले भलभले राजे रजवाडे, भलेभले महाराज हे माना खाली घालुन औरंगजेबाच्या दरबारात उभे राहत होते. तेव्हा फक्त शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवून या हिंदुस्तानाच्या मातीला स्वाभिमान काय असतो हे शिकवत होते. या महाराजांविषयी तुम्ही अशी वक्तव्ये करता. छत्रपती शिवाजी महाराज देव नक्कीच नाहीत, पण ते आम्हाला देवापेक्षा कमी नाही. महाराज आमची अस्मिता होते, आहेत आणि राहतील. त्रिवेदी यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि भाजपने शिवरायांबद्दल आपली नेमकी भूमिका काय ती स्पष्ट करावी आणि महाराष्ट्राची अस्मिता दुखावल्याबद्दल संपुर्ण राज्याची माफी मागावी. अशा शब्दांत भाजपला खडसावलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in