आम्ही एक चांगला माणूस गमावला; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

Aditya Thackeray| शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे गुरूवारी (ता. २६ ऑक्टोबर) दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले
Aditya Thackeray|
Aditya Thackeray|

पुणे : शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार विनायक निम्हण (Vinayak Nimhan) यांचे गुरूवारी (ता. २६ ऑक्टोबर) दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण, सून, नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान, काल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही पुण्यातच होते. निम्हण यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांनी निम्हण यांच्या पुण्यातील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. ''ज्येष्ठ शिवसैनिक जुना सहकारी आणि एक चांगला माणूस आपण गमावला. बातमी कळली आणि सुरवातीला हे खोटं असल्यासारखं वाटलं. त्यांच्या परिवारासोबत नेहमी आमचे चांगलें संबंध आहेत. आम्ही कायम त्यांच्या सोबत आहोत. अशा भावना आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे या देखील उपस्थित होत्या.

Aditya Thackeray|
Aaditya Thackeray : सत्तारांचा राजीनामा घ्यायला हवा, पण कोण घेणार? ठाकरे म्हणाले...

माजी आमदार विनायक निम्हण आज दुपारी ह्‌दयाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर कुटुंबीयांना त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातच ह्‌दयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. विनायक निम्हण यांच्या निधनामुळे ऐन दिवाळीत निम्हण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज रात्री उशिरा त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

निम्हण यांनी शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा, तर काँग्रेसकडून एकदा विधानसभेची निवडणूक जिंकली होती. ते सध्या शिवसेनेत होते. मात्र, ते गेल्या काही वर्षांपासून सक्रीय राजकारणापासून दूर होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनीही राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरही शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com