महाविकास आघाडीची भूमिका ठरविण्यासाठी आम्हाला एकत्रित बसावे लागेल

राज्यातील नवीन राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडीची काय भूमिका असणार यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी मत व्यक्त केले.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

मुंबई - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून सादर केले आहे. राज्यातील या राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडीची काय भूमिका असणार यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी मत व्यक्त केले. Balasaheb Thorat News Update

बाळासाहेब थोरात म्हणाले की, उद्धव ठाकरे हे सरळ स्वभावाचे, संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना काही गोष्टी नाही रूचत त्यामुळे राजीनामा देऊन ते मोकळे झाले, असे त्यांनी सांगितले.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, आम्ही कायदेशीर लढाईसाठी सज्ज

शिवसेनेच्या कायदेशीर लढाई विषयी त्यांनी सांगितले की, पुढे काय घडते हे मला माहिती नाही. हा शिवसेनेचा प्रश्न आहे. ते निर्णय घेतील, असे त्यांना स्पष्ट केले.

महाविकास आघाडीच्या भूमिकेबाबत ते म्हणाले, महाविकास आघाडीची भूमिका ठरविण्यासाठी आम्हाला एकत्रित बसावे लागेल. चर्चा करावी लागेल. विरोधी पक्षनेता कोण हे ठरवावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Balasaheb Thorat
काँग्रेसचे पाच आमदार नॅाट रिचेबल; बाळासाहेब थोरात म्हणाले...

शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी मात्र शिवसेना फुटण्याला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला दोषी ठरविले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट होणे विरोधी गटासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com