Ajit Pawar News: ''...तर आम्ही काय मूग गिळून गप्प बसलो नाही!''; राज्य सरकारला पवारांचा इशारा

सरकार नको ते वाद उकरुन महागाई, बेरोजगारी सारख्या मुळविषयावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे.
Ajit Pawar News :
Ajit Pawar News :

Ajit Pawar news : आम्ही पहिल्यापासून शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने पुढे जातो, पुरोगामी विचाराने पुढे जात आहोत. आमच्या पक्षात सर्व जाती धर्माचा आदर केला जातो. त्यामुळे ते बाऊ करतात त्याला काडीचा अर्थ नाही. राज्यात ज्या घटना घडत आहे. सत्ताधारी पक्ष वेगळे वातावरण निर्माण करत आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली आहे. सरकार नको ते वाद उकरुन महागाई, बेरोजगारी सारख्या मुळविषयावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे. असही पवार यांनी यावेळी सांगितलं.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. याचवेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेल्या कारवाईवरही भाष्य केलं आहे. विरोधकांना त्रास देण्यासाठी ते कुणाला अडकवण्याचा प्रयत्न करत असतील तर सहन करणार नाही. राजकीय सुडापोटी कारवाई करण चुकीच आहे. जितेंद्र आव्हाड दोन गुन्हे दाखल केले होते, खरचं चुका झाल्या असतील तर त्याच्याविरोधात कारवाई करायलाच हवी. पण जाणीवपुर्वक कट रचून कोणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, एक्सवायझेड ला उभं करुन त्याला संबंधित व्यक्तीविरोधात केस दाखल कर आणि मग आम्ही लक्ष घालु ही महाराष्ट्राची परंपरा नाही. आम्हीही १९९९ ते २०१४ आणि २०१९ ते २०२२ या काळात सत्तेत होतो. पण आम्ही कधीही असंकाही करण्याचा प्रयत्न केला नाही. विरोधी पक्षाला संपवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राची जनता हे कधीही सहन करणार नाहीय.

Ajit Pawar News :
NCP News; पडळकर सुधरा, अन्यथा यथेच्छ तुडवू!

जितेंद्र आव्हाड यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. असा सवाल विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले की, एखाद्या व्यक्तीवर बलात्कार न करता जर कोणावर बलात्काराचा गुन्हा दाखल होत असेल तर ही तर मोगलाई लागलीये का. असं जर होणार असेल तर महाराष्ट्रही शांत बसणार नाही, लोकांनाही कळतं कशा पद्धतीने अडकवण्यात येत आहे. जर असे अडकवण्याचा प्रयत्न केला जात असेल. वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर केला जात असेल तर आमच्याकडेही वेगवेगळी आयुधं आहेत, आम्ही काय मुग गिळून गप्प बसलेलो नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in