आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो ; मलिकांच्या टि्वटला वानखेडेंचे प्रत्युत्तर

ज्ञानदेव वानखेडे (Gyandev Wankhede) यांनी मलिक (nawab malik) यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.
आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो ; मलिकांच्या टि्वटला वानखेडेंचे प्रत्युत्तर
sameer wankhede,Kranti Redkarsarkarnama

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते नवाब मलिक सातत्याने करीत आहेत. त्यासदर्भातील काही पुरावे देखील ते सादर करीत असतात. रविवारी मध्यरात्री मलिकांनी दुबईहून पुन्हा एकदा समीर वानखेडे यांचा एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोमध्ये समीर वानखेडे हे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत.

मलिक यांनी वानखेडे यांच्याबाबत फोटो शेअर केल्यानं खळबळ उडवून दिली आहे. या फोटोवरुन मलिकांची वानखेडेंना जाब विचारला आहे. या फोटोबाबत वानखेडे काय उत्तर देणार याकडे सगळ्याचे लक्ष लागते होते. या फोटोबाबत समीर वानखेडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी काही फोटो शेअर करीत मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

नवाब मलिक यांच्या ट्विटनंतर समीर वानखेडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Gyandev Wankhede) यांनीही काही छायाचित्रे शेअर करीत ''आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो,'' असे म्हटले आहे. सध्या मलिक आणि वानखेडे यांनी टि्वट केलेल्या फोटोंवरुन सोशल मीडियामध्ये चर्चा रंगली आहे.

मलिक यांनी मध्यरात्री टि्वट केलेल्या फोटोत समीर वानखेडे आणि आणखी एक व्यक्ती दिसत आहे. हा फोटो समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या निकाहाचा असल्याचे दिसते. याबाबत नवाब मलिकांनी (nawab malik) अधिक तपशील दिलेला नाही. ''यह क्या किया तुने sameer Dawood Wankhede? असा प्रश्न मलिकांनी टि्वट करुन उपस्थित केला आहे.

sameer wankhede,Kranti Redkar
जळगाव जिल्हा बँक : खडसेंचे पुन्हा वर्चस्व ; माघार घेतलेल्या महाजन विजयी

ज्ञानदेव वानखेडे (Gyandev Wankhede) यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. यावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्या. माधव जामदार यांनी निकाल राखून ठेवला आहे. बुधवारी मलिक यांच्या वतीने ॲड. अतुल दामले यांनी अतिरिक्त कागदपत्रे दाखल करण्याची विनंती न्यायालयात केली. यावर वानखेडे यांच्या वतीने ॲड. अर्शद शेख यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्या. जामदार यांनी दोन्ही पक्षकारांना अतिरिक्त कागदपत्रे देण्यासाठी परवानगी दिली. तसेच, यापुढे आणखी कागदपत्रे सादर करता येणार नाहीत, असेही स्पष्ट केले.सोमवारी (ता. 22) न्यायालय यावर निर्णय जाहीर करणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in