Vanchit News : ठाकरे अन् वंचितची आघाडी; काँग्रेसचे पटोले म्हणतात, "आम्हांला माहितच नाही.."

Nana Patole : पोटनिवडणुकीतील वंचितच्या भूमिकेने महाविकास आघाडीची पंचायत
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

प्राची कुलकर्णी

MVA and Vanchit : महाविकास आघाडीचा घटक असलेला ठाकरे गट आणि वंचित बहुजन यांच्यात आघाडी झालेली आहे. दरम्यान वंचित अद्यापही महाविकास आघाडीचा घटक पक्ष झालेला नाही. त्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करीत असल्याचे वंचितचे प्रकाश आंबेडकर वारंवार सांगतात. त्याबाबत मात्र अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. दरम्यान आज 'साम' या वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडीत वंचितच्या स्थानाबाबत विधान केल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई महानगरपालिका (BMC) आणि आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वंचित आणि ठाकरे गटाची आघाडी झालेली आहे. वंचितला महाविकास आघाडीत (MVA) सहभागी करण्यासाठी ठाकरे प्रयत्न करीत आहेत. असे असतानाही मधल्या काळात वंचितचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादी ही भाजपसोबत असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले होते.

गेल्या लोकसभा आणि विधानसभेला वंचितमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला फटका बसल्याची चर्चाही आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) हे वंचितला महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी राजी होतील का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Nana Patole
Nana Patole : प्रदेशाध्यक्षपद जाणार की राहणार? काँग्रेसच्या नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

सध्या चिंचवड आणि कसब्यात पोटनिवडणुका सुरू आहे. महाविकास आघाडीतील स्थान पक्कं नसल्याने या निवडणुकीत वंचितच्या भूमिकेकेकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानंतर वंचितने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचीच पंचायत झाली.

चिंचवडमध्ये वंचितने ठाकरे गटातील बंडखोर व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना पाठिंबा दिला. त्यानंतर आंबेडकर यांनी कलाटे यांच्यासाठी प्रचारही केला. तर कसब्यात त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Nana Patole
Nana Patole News : 'सत्यजीत तांबे गेले, मी पन्नास आमदार आणीन....'

दरम्यान, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वंचितला महाविकास आघाडीत स्थान मिळाले तर राज्यच काय देशातही फायदा होईल, असा दावा केला होता. त्यावेळी त्यांनी देशात सत्ता मिळविण्याचे गणितही मांडले होते. त्यानंतर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी वंचितला महाविकास आघाडीत स्थान देण्यावरून एक विधान केले आहे.

नाना पटोले म्हणाले, "वंचित आणि सेनेचे नेमके कुठल्या मुद्द्यावर आघाडी झाली ते अजून स्पष्ट नाही. त्याबाबत अजून काही बाहेर आलेले नाही. मात्र वंचितने प्रस्ताव ठेवला आम्ही तर विचार करू."

Nana Patole
Future CM Posters : माझे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून पोस्टर्स लावणाऱ्यांना पोलिसांनी शोधावे : सुप्रिया सुळे

दरम्यान राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी वंचितचा प्रस्ताव आला नसल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते की, "वंचित बहुजन आघाडीची ठाकरेंच्या शिवसेनेशी युती झाली आहे. वंचितसोबत आघाडीचा प्रस्ताव आमचा नाही. त्याबाबत प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत कुठलीही चर्चा झालेली नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in