आम्ही तुमचे भाऊ आहोत; देवेंद्र फडणवीसांनी दिला आंबेघर बाधितांना धीर

कुटुंबातील सर्वस्व गमावलेल्या लोकांशी चर्चा करताना, ''आम्ही तुमच्यासोबत असून आम्ही तुमचे भाऊ आहोत'' असे म्हणत बाधित कुटुंबातील लोकांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला.
आम्ही तुमचे भाऊ आहोत; देवेंद्र फडणवीसांनी दिला आंबेघर बाधितांना धीर
We are your brothers; Devendra Fadnavis gave patience to those affected by the Ambeghar

मोरगिरी : आंबेघर येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबातील लोकांशी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. त्यांचे दुःख समजून घेतले. त्यांच्या सोबत जेवणही करून त्यांनी धीर दिला. त्यामुळे उपस्थीत बाधितांनाही आश्रू अनावर झाले. त्यांनी त्यांच्या दुःखाचा बांध तेथे मोकळा केला.

आम्ही तुमच्या सोबत असून आम्ही तुमचे भाऊ आहोत, असे म्हणत बाधित कुटुंबातील लोकांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला. त्यांच्यासोबत जेवणाच्या आग्रहाचा स्वीकार करीत जेवणही घेतले. आमदार प्रविण दरेकर यांनी सुद्धा त्यांची सोबत बसून जेवण घेतले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आंबेघर येथे भूस्खलनामुळे बाधित झालेल्या कुटुंबातील लोकांची भेट घेण्यासाठी आले होते.

ते ज्या वेळी आले, त्यावेळी आंबेघर शिद्रुकवाडी येथील बाधित कुटुंबातील लोक जेवण करीत होते. जेवण होवू द्यात..आपण नंतर बोलू या, असे म्हणाले आमच्या सोबत जेवण घ्या, असा आग्रह बाधित कुटुंबांनी केला. त्या आग्रहाचा स्वीकार करीत त्यांनी जेवण घेतले. कुटुंबातील सर्वस्व गमावलेल्या लोकांशी चर्चा करताना, ''आम्ही तुमच्यासोबत असून आम्ही तुमचे भाऊ आहोत'' असे म्हणत बाधित कुटुंबातील लोकांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला. त्याच ठिकाणी प्रांत अधिकारी श्रीरंग तांबे यांच्याकडून काय काय उपाय योजना केल्यात याची माहिती घेतली. 

यावेळी गावाचं संपूर्ण पुनर्वसन करण्याची मागणी असल्याने ग्रामस्थांनी त्यांना सांगितले. यावेळी तसेच त्यांना शेड बांधून निवाऱ्याची सोय करावी लागणार आहे. त्याकरिता त्यांच्या पसंतीची जागा बघावी लागणार आहे. ज्या कुटुंबात कोणी उरलेलं नाही. अशाच्या बाबत शासनाला वेगळा विचार करावा लागणार आहे. मुख्ममंत्री निधीतून त्यांना मदत झाली पाहिजे. त्याच्या राहण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Related Stories

No stories found.