'आम्ही विचारांचे वारसदार' : शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचे पहिले पोस्टर जाहीर

Dasara Melava : 'विचारांचे आम्हीच वारसदार' असा उल्लेख करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न..
Dasara Melava
Dasara MelavaSarkarnama

मुंबई : दसरा मेळाव्यावरून शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गट यांच्यातल्या वादाला आता अधिकाधिक धार येताना दिसून येत आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. शिवाजी पार्क मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये उर्जा भरली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचाही दसरा मेळावा मुंबईच्या बीकेसी मैदानात होणार आहे. आता शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचं पहिलं पोस्टर जाहीर करण्यात आले.

Dasara Melava
Dasara Melava : आम्हीच खरी 'शिवसेना' हे दाखवण्यासाठी ठाकरे-शिंदे गट सज्ज , गर्दी जमविण्याचे 'टार्गेट'

शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याच्या जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो टाकण्यात आले आहे. यासह बाळासाहेब ठाकरे यांच्या 'विचारांचे आम्हीच वारसदार' असा उल्लेख करून अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आले आहे. यासोबतच आमचा मेळावा हाच शिवसेनेचा दसरा मेळावा असल्याचे लिहण्यात आले आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट दोन्हीकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरु झाली आहे. ठाकरे गटाकडून पक्षातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याची माहिती मिळते. आजपर्यंत झाला नाही असा दसरा मेळावा भरवण्याकरिता पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Dasara Melava
खरी 'शिवसेना' कोण? दसरा मेळाव्यातच स्पष्ट होईल : रामदास कदमांचा इशारा!

शिंदे गटाने औरंगाबाद जिल्ह्यातून तब्बल १० हजार वाहनांतून २५ हजार जणांना नेण्याचे नियोजन केले आहे, तर उद्धव सेनेच्या गटाने ३ हजार वाहनांतून १५ हजार कार्यकर्त्यांना मुंबईत नेण्याची तयारी केली आहे. दाेन्ही गटांकडून शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्त्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com