Raj Thackeray : आपण सत्तेपासून दूर नाही, लवकरच सत्तेत असणार; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास

Thane News : ''मी फक्त आशा दाखवत नाहीये. मला माहिती आहे...''
Raj Thackeray News
Raj Thackeray News Sarkarnama

MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिन सोहळा आज ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तसेच महापालिका निवडणुका जेव्हा लागतील, तेव्हा मनसे सत्तेत असणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज ठाकरे म्हणाले, ''बहुमत हाती यायला भाजपाला १९५२ ते २०१४ इतका वेळ वाट पाहावी लागली. मात्र, मनसेला एवढा वेळ लागणार नाही. मी बहुमत लवकर आणणार. त्यामुळे मनसे सत्तेपासून दूर नाही''.

''मी फक्त आशा दाखवत नाहीये. मला माहिती आहे. आपल्याला महानगरपालिका जिंकायच्या आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आपण सत्तेत असणार म्हणजे असणार'', असं म्हणत त्यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

Raj Thackeray News
MNS : सांगितलं होतं ना आपल्या वाट्याला कुणी जायचं नाही, शेवटी मुख्यमंत्रीपद गेलं ना; राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

''सध्या जनता या सर्वांना विटलेली आहे. मी बोलत राहणारच. मी मतदारसंघापर्यंत भाषणासाठी येईल. पण तुम्ही प्रत्येक घराघरांपर्यंत जा. आपण सत्तेपासून दूर राहणार नाहीत. लवकरच सत्तेत येण्यासाठी नवं निर्माणाचे काम आपण करणार आहोत.

जनता सध्याच्या राजकीय तमाशांना विटलेली आहे. आपण फक्त त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा महानगरपालिका निवडणुका लागतील, तेव्हा मनसे सत्तेर असणार म्हणजे असणार'', असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Raj Thackeray News
Raj Thackeray : देशपांडेंना स्टेजवर बोलवत राज ठाकरेंचा हल्लेखोरांना इशारा; माझ्या मुलांचे रक्त वाया जाऊ देणार नाही!

''मशिदींवरील भोंग्याबाबत आंदोलन केलं होतं. तेव्हा १७ हजार केसेस मनसैनिकांवर दाखल केल्या गेल्या. पण मी सांगितलं होतं आपल्या वाट्याला जायचं नाही. शेवटी मुख्यमंत्री पदावरून जावं लागलं'', असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com