संजय राऊतांचा सत्तेचा माज शिवप्रेमी जनता उतरवेल : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

संभाजीराजे छत्रपती यांच्या अपक्ष राज्यसभा उमेदवारीस विरोध केल्याने मराठा संघटना आक्रमक
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama

नवी मुंबई : संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) यांच्या राज्यसभेच्या (Rajya Sabha) अपक्ष उमेदवारीला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सातत्याने विरोध करत आहेत. त्यामुळे राऊत यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा प्रचंड आक्रमक झाला आहे. संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता नक्की उतरवेल. आगामी २०२४ च्या निवडणुकीत तुम्हाला याची राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) राज्य समन्वयक अंकुश कदम यांनी दिला आहे. (Warning to MP Sanjay Raut of Maratha Kranti Morcha)

संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, अशी अट शिवसेनेने घातली होती. मात्र, संभाजीराजे हे अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम राहत शिवसेनेचा प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावला. या सर्व प्रक्रियेत संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीला संजय राऊत सातत्याने विरोध करत आहेत, असा दावा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे मराठा संघटना राऊतांविरोधात प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. त्यातूनच त्यांनी वरील इशारा दिला आहे.

Sanjay Raut
शिवसेनेकडून संजय पवारांची उमेदवारी पक्की?; अनिल देसाईंनी केली कागदपत्रांची तपासणी

मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र समन्वयक अंकुश कदम म्हणाले की एकीकडे प्रियांका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना अटी शर्थी न टाकता राज्यसभेवर पाठविण्याची तयारी दाखवता. मात्र, ज्या छत्रपतींच्या नावावर एवढी वर्षे राजकारण करत आहात, एवढी वर्ष सत्ता भोगत आहेत. त्या शिवसेनेमधील शिव आमच्या छत्रपतींचा आहे. असं असतानाही संजय राऊत हे संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीस विरोध करत आहेत.

Sanjay Raut
भाजप सहाव्या जागेसाठी वापरणार ‘धक्कातंत्र’ : फडणवीस घेणार अंतिम निर्णय!

संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता नक्की उतरवेल. आगामी 2024 च्या निवडणुकीत संजय राऊत तुम्हाला याची राजकीय किंमत मोजावी लागणार आहे. पण, संभाजीराजे हे अपक्षच निवडणूक लढवणार आहेत, असेही अंकुश कदम यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in