ठाकरे ठाम; काँग्रेस जाम, महापालिकांसाठी तीनचाच प्रभाग

महापालिकांच्या निवडणुकांसाठी तीन सदस्यांचा प्रभाग राहणार आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : महापालिका निवडणुकांसाठीची प्रभाग पध्दत बदलण्यावरून काँग्रेसने उघड; तर राष्ट्रवादी काँग्रेसने (Ncp) छुपी आदळआपट करूनही या निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा प्रभाग पध्दत कायम ठेवण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ठाम राहिले आहेत.

तीन सदस्यांच्या प्रभागांचा फेरविचार करून दोन सदस्यांचा प्रभाग करण्याचा काँग्रेसच्या फेरप्रस्तावावर ठाकरे यांनी मंगळवारीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'लाल फुली' मारली. त्यामुळे येत्या फेब्रुवारीत होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांसाठी तीन सदस्यांचा प्रभाग राहणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी नगरपरिषदांमधील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे प्रस्थ मोडीत काढण्याच्या हेतूने, या निवडणुकांसाठी भाजपने ठरविलेल्या बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीलाच ठाकरे यांनीही पसंती दिल्याने दोन्ही काँग्रेसला धक्का मानला जात आहे. दोन्ही काँग्रेसलाच काय शिवसेनेलाही तीन सदस्यांचा प्रभाग परवडणार नाही, मग भाजपच्या फायद्याचे प्रभाग केल्याने महापालिकेच्या रणसंग्रामासाठी शिवसेना, भाजपशी 'मिलीभगत' झाल्याचाही संशय राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

Uddhav Thackeray
शिवसेनेच्या पाच नेत्यांची सोमय्यांनी उडवलीय झोप!

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी प्रभाग पध्दती बदलचा प्रयत्न झाला; त्यासाठी दोन्ही काँग्रेसने दोन सदस्यांच्या प्रभागाला पसंती दिली; मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालच्या गेल्या आठवड्यातील बैठकीत मुंबई वगळता इतर शहरांसाठी तीनचा प्रभाग केला. त्यावरून लगेचच ठाकरे सरकारमध्ये वादाला सुरवात होऊन, तीनऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग करण्याचा आग्रह काँग्रेसने धरला. त्यानंतर फेरस्तावही ठाकरे यांना पाठवून, दोनचा प्रभाग होणार असल्याचे काँग्रेस नेते सांगत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही नव्या निर्णयाचे संकेत दिले होते. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. काँग्रेसच्या प्रस्तावावर प्रचंड चर्चा झाली; त्यानंतरही ठाकरे यांनी निर्णयात कोणताही बदल केला नाही. मागील निवडणुकांत याच बहुसदस्यीय प्रभागामुळे आपली पिछेहाट झाली आहे.

Uddhav Thackeray
मोठी बातमी : सॅटलाईट इमेजिंगच्या माध्यमातून होणार प्रभागांची सीमानिश्चिती

त्याचा फटका शिवसेनेलाही बसला आहे; तेव्हा पुन्हा तीनचा प्रभाग का, अशी विचारणा करीत, काँग्रेसने अप्रत्यक्षरित्या ठाकरे यांच्या निर्णयावर संशय व्यक्त केला आहे. छोट्या विशेषतः एक-दोन सदस्यांच्या प्रभागांतून काँग्रेसला विजयाची खात्री आहे. तर दोनचा प्रभाग सुगीचे दिवस आणण्याची आशा राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. शिवसेनेचीही स्थिती फारसी वेगळी नाही, मुंबई इतर महापालिकांत एकाच सदस्यांच्या प्रभागांतून शिवसेनेचे अधिक नगरसेवक निवडून आल्याचा इतिहास आहे. राज्याची सत्ता आणि त्यातही मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असल्याने एक किंवा दोन सदस्यांचा प्रभाग का केला नाही. तसे झाले असते. पुढच्या निवडणुकांत भाजपची घसरण होऊन शिवसेना, सरकारमधील सकहारी पक्षांसाठी बेरजेचे राजकारण ठरले असते, असेही सांगण्यात येत आहे.

प्रभाग पध्दतीवरून ठाकरे सरकारमधील वाद चव्हाट्यावर आले; तरी त्याकडे सोयीस्कररित्या काणाडोळा करीत, ठाकरे हे काँग्रेसला जुमानणार नसल्याचे त्यांच्या आतापर्यंतच्या 'वर्किंग स्टाइल'वरून दिसत आहे. याआधी विधानसभा अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा आग्रह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करूनही ठाकरे यांनी अध्यक्षपदाची निवडणूक टाळली होती. कोरोना काळातील लॉकडाऊन, सवलती, शाळा, महाविद्यालये उघडण्याच्या महत्त्वांच्या निर्णयांत ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसला लांब ठेवूनच भूमिका जाहीर केल्या. या घटना पाहता प्रभाग पध्दतीत बदलच काय तर साधा फेरप्रस्तावाचा विचार ठाकरे करण्याची सुतराम शक्यता नसल्याचे आधीच स्पष्ट होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com