संजय राऊतांच्या 'त्या' आरोपांवर वळसे पाटलांनी केली मोठी घोषणा

ED| Sanjay Raut| Dilip Walse Patil| अलीकडच्या काळात भडकाऊ भाषणे करून समाजासमाजामध्ये तेढ व संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न
संजय राऊतांच्या 'त्या' आरोपांवर वळसे पाटलांनी केली मोठी घोषणा

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी ईडी अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची एसआयटी (SIT) नेमून चौकशी करण्यात येईल. अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करेल व त्यांना तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip-walse Patil) यांनी आज सकाळी माध्यमांना दिली.

दिलीप वळसे पाटील यांनी आज जनता दरबारात विविध प्रश्नांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अलीकडच्या काळामध्ये भडकाऊ भाषणे करून समाजासमाजामध्ये तेढ व संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. ही बाब राज्याच्या व देशाच्या एकतेच्या दृष्टीकोनातून बरोबर नाही, यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

संजय राऊतांच्या 'त्या' आरोपांवर वळसे पाटलांनी केली मोठी घोषणा
भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांना तीन महिने कारावासाची शिक्षा...

दरम्यान, आज दुपारी खासदार संजय राऊत यांच्या दादर आणि अलिबागमधील संपत्ती ईडीने जप्त केली. या कारवाईवर संजय राऊत यांनी असत्यमेव जयते, गांधीजी आज परत मरण पावले, असे म्हणत प्रतिक्रीय दिली आहे. तसेच, राज्यातील महाविकास आघाडीसरकार पडावे, यासाठी ही कारवाई केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मला ईडीच्या या कारवाईची पुर्वकल्पना होती. माझ्यावर राज्यातील सरकार पाडण्यासाठी दबाव टाकला गेला. सुडबुद्धीतून ही कारवाई करण्यात आली आहे. पण अशा कारवायांमुळे संजय राऊत तुमच्यापुढे गुडघे टेकणार नाही, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

ईडीने जप्त केलेली संपत्ती ही कष्टाने कमावलेली संपत्ती आहे. त्यातील एक रुपयाची संपत्ती अवैध मार्गाने, चूकीच्या मार्गाने कमावलेली सापडली, असेल तर ती सर्व संपत्ती भाजपच्या खात्यावर जमा करेल असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, जर आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेल, पण सुडाच्या कारवायांना घाबरणार नाही, असेही त्यांनी नमुद केलं. त्यामुळे आता राज्य सरकार या कारवाईवर काय पाऊल उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in