आम्ही एकत्रितपणे ठरवू त्यानुसारच मतदान होईल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी या निवडणुकीतील रणनीती बाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य पत्रकारांशी बोलताना केले.
आम्ही एकत्रितपणे ठरवू त्यानुसारच मतदान होईल
Balasaheb Thorat Sarkarnama

मुंबई - विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी सोमवारी ( ता. 20 ) मतदान होणार आहे. या निवडणुकीतील सतर्कता म्हणून महाविकास आघाडीतील सर्व आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवले आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील जागांसाठी ज्या प्रमाणे आमदारांचा घोडेबाजार झाला तसा होऊ नये यासाठी महाविकास आघाडीचे नेते आमदारांना मार्गदर्शन करत आहेत. या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी या निवडणुकीतील रणनीती बाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य पत्रकारांशी बोलताना केले. ( Voting will be as we decide together )

बाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीत काहीही मतभेद नाहीत. सहावा उमेदवारही महाविकास आघाडीचाच आहे. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचा पाठिंबा आहे. आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्रितपणे जे ठरवू त्याप्रमाणेच विधानपरिषदेचे प्राधान्यक्रमानुसार मतदान होईल. आमचे सहाही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Balasaheb Thorat
अहमदनगर जिल्ह्यातून पेट्रोल-डिझेलला हद्दपार करा

ते पुढे म्हणाले की, सोमवारी ( ता. 20 ) मतदान आहे. काँग्रेस पक्षाचे 44 आमदार, मंत्री आणि दिल्लीचे काही प्रभारी या निमित्ताने मुंबईत आले आहेत. विधानपरिषदेतील मतदान हे प्राधान्यक्रम स्वरूपाचे आहे. त्यानुसार प्रधान्यक्रम मतदाराला ठरवावा लागतो. याची प्राथमिक चर्चा आम्ही केली आहे. उद्याच्या बैठकीत आणखी बारकाव्याने महाविकास आघाडीच्या आमदारांशी चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. या उमेदवाराचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने केल्याचा आरोप भाजपने केला होता. या संदर्भात प्रश्न विचारला असता मंत्री थोरातांनी सांगितले की, आमचा 42चा कोटा होता. आमच्या उमेदवाराला 44 मते मिळाली, हे खरे आहे. ही मते कशी पडली. हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे असा आक्षेप आता काँग्रेसवर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Balasaheb Thorat
पाथर्डीत शक्तीप्रदर्शन करत पंकजा मुंडे देणार भाजपला संदेश...

भाजपची भुमिका गुलदस्त्यात

या निवडणुकीतील मतदान गुप्त पद्धतीने केले जाणार असल्याने भाजप काय करते यावर निवडणुकीचा निकाल ठरण्याची शक्यता आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमचे सर्व उमेदवार सहज विजयी होतील असे सांगितले होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडून मतांचे विभाजन होऊ नये यासाठी अधिक खबरदारी घेतली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in