Pune By Election Result : निवडणुकीच्या निकालातून मतदारांनीच भाजपच्या सत्तेची मस्ती उतरवली; पटोलेंचा हल्लाबोल

Nana Patole : कसबा, चिंचवडमध्ये भाजपने गैरप्रकार केल्याचा आरोप
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Congress News : महाराष्ट्रात शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचारांना मूठमाती देण्याचे काम तत्कालीन राज्यपाल, भाजपचे काही मंत्र्यांनी सतत केले. काही काळापासून भाजप महापुरुषांचा अवमान करीत आहे. त्याचे उत्तर कसबेकरांनी दिले आहे. देशात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. छोट्या व्यापऱ्यांच्याही समस्यांत भर पडली. या निवडणुकीतून मतदारांनी भाजपची सत्तेची मस्ती उतरवली आहे, असा घाणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यावेळी नाना पटोले (Nana Patole) यांनी चिंचवडमध्ये बंडखोरीचा फटका बसल्याचे सांगितले. ते म्हणाले, "कसबा आणि चिंचवड (by election) निवडणुकीत भाजपने जिंकण्यासाठी सर्व मार्गांचा वापर केला. उघडपणे पैसे वाटल्याची अनेक प्रकरणे समोर आली. चिंचवडमध्ये सहानुभूतीचा प्रकार दिसून आला नाही. तेथे अपक्ष उमेदवाराला मनविण्यास आम्ही कमी पडलो. त्याचा फटका बसला आम्हाला बसला आहे. काटे आणि अपक्ष कलाटे यांची मते पाहिले तर ती भाजपच्या उमेदवारापेक्षाही जास्त होतात."

Nana Patole
Chinchwad By-Election : राहुल कलाटेंमुळे अश्विनी जगतापांचा विजय झाला सोपा; भाजपचा नैतिक पराभवच

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्यातील पोटनिवडणुकांबाबत बोलत नाहीत. ते उत्तर-पूर्व राज्यात भाजपला यश मिळाल्याचे सांगतात. त्याबाबतही फडणवीस खोटे बोलत असल्याची टीका पटोले यांनी केली. पटोले म्हणाले, "देवेंद्र फडणवीस रेटून खोटे बोलतात. नॉर्थ इस्टमध्ये भाजपचा विजय कसा झाला हेच ते सांगत आहेत. मात्र पश्चिम बंगालमध्ये, तामिळनाडूतील पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला. तसेच एकही जागा नसलेल्या त्रिपुरात पाच तर नागालँडमध्येही दोन जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत."

Nana Patole
Devendra Fadnavis : ''...तर कसब्याप्रमाणेच नागपूरमध्ये फडणवीसांचा पराभव शक्य!''; काँग्रेस नेत्याचं खळबळजनक विधान

आता देशातील नागरिकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील (Narendra Modi) विश्वास कमी होत असल्याचेही पटोलेंनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, "या निवडणुकीतून देशातील एनडीएची घसरण सुरू झाल्याची दिसून येत आहे. देशातील नागरिकांचा पंतप्रधान मोदींवरील विश्वास कमी होत आहे. त्यांनी महागाई वाढवून जनतेचा विश्वासघात केला. मूठभर लोकांसाठी देशाला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम केले. हे आता लोकांच्या लक्षात येत आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in