जयंत पाटलांची उल्हासनगरात दुसऱ्यांदा धाव; दोन बड्या पदाधिकाऱ्यांत घडवला समन्वय

राष्ट्रवादी वाढवण्याच्या उद्देशाने किंबहुना रणनीती तयार करण्यासाठी कलानी महाल गाठला.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama

उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्ष वाढीसाठी उल्हासनगरात दुसऱ्यांदा धाव घेतली आहे. विशेष म्हणजे पाटील यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष पंचम कलानी आणि माजी जिल्हाध्यक्ष सोनिया धामी यांच्याशी समनव्यक साधण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेटी दिली.

मागील महिन्यात जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे कलानी महालात आले होते. त्यानंतर काही तासांतच राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदावर असलेल्या सोनिया धामी यांची प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यापाठोपाठ पंचम कलानी यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्तीच्या दुसऱ्याच दिवशी पंचम कलानी यांनी भाजप नगरसेविका पदाचा राजीनामा आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे सोपवला होता. त्याच दिवशी आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला होता.

Jayant Patil
जेव्हा जयंत पाटील लोकलने प्रवास करतात...

त्यानंतर ओमी कलानी यांनी त्यांची टीओकेची संपूर्ण टीम राष्ट्रवादीत विलीन केली. या घडामोडींना महिना होण्यापूर्वीच जयंत पाटील यांनी पुन्हा उल्हासनगरात धाव घेतली. राष्ट्रवादी वाढवण्याच्या उद्देशाने किंबहुना रणनीती तयार करण्यासाठी कलानी महाल गाठला. पप्पू कलानी, ओमी कलानी, पंचम कलानी, सीमा कलानी, मनोज लासी, कमलेश निकम, सुमित चक्रवर्ती यांनी त्यांचे स्वागत केले. जर्जर आणि धोकादायक इमारतींबाबत लवकरच ठोस निर्णय घेण्यात येणार असून विकास निधी उपलब्ध करून देण्यात येणार, असल्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.

Jayant Patil
एसटी संपाबाबत शरद पवारांचं मोठं विधान; विलीनीकरणावर मांडली रोखठोक भूमिका

उल्हासनगरात अनेक मुख्य चौकात राष्ट्रवादीच्या एलईडी घड्याळी बसवण्यात येणार आहेत. पाटील यांनी सोनिया धामी यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि धामी यांना सन्मानपूर्वक प्रदेश सरचिटणीस पदाचे नियुक्तीपत्र सोपवले. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, निरीक्षक भगवान टावरे, सभागृहनेते भारत गंगोत्री उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com