दिल्लीनंतर मुंबईतही राडा; कळस यात्रेत दोन गटात तुंबळ हाणामारी

mumbai| hindu-muslim Politics| राज्यात भोंगे विरुद्ध हनुमान चालीसा वाद पेटला असतानाच आरे कॉलनीत झालेल्या राड्यामुळे या संघर्षात भरच पडली आहे.
दिल्लीनंतर मुंबईतही राडा; कळस यात्रेत दोन गटात तुंबळ हाणामारी
Violent clashes between two groups in Aarey Colony

मुंबई : राजधानी दिल्लीतील(Delhi) जहांगीरपुरीमधील हिंसाचाराची घटनेनंतर मुंबईच्या (Mumbai) आरे कॉलनीतही काल रात्री वाद शिगेला पोहोचला होता. मुंबईतील आरे कॉलनीत दोन गटात शिवमंदिरातील कळस यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वाद निवळला सध्या या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.राज्यात भोंगे विरुद्ध हनुमान चालीसा वाद पेटला असतानाच आरे कॉलनीत झालेल्या राड्यामुळे या संघर्षात भरच पडली आहे.

Violent clashes between two groups in Aarey Colony
तोळामासाची काँग्रेस सत्यजित देशमुखांना कोणत्या पदाचा शब्द देणार?

मिळालेल्या माहितीनुसार, आरे कॉलनीत शिव कलश यात्रेच्या मिरवणुकीत दोन गटात वाद सुरू झाला आणि आणि मिनिटातच त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं. मात्र पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत या वाद थांबवला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

भोंग्यांचा वादराज्यात इतर ठिकाणीही वाद उसळला.अमरावतीतील अचलपूर आणि परतवाडा शहरात वाद पेटला होता. अचलपूर शहरातील दुल्ला गेट परिसरात झेंडा हटवण्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे संपूर्ण राज्यात तणाव निर्माण झाला होता. पण या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.