विनोद तावडेंची परफेक्ट खेळी : बहुमत नसताना मिळविले महापौरपद

विनोद तावडे (Vinod Tawade) यांना भाजप संघटनेत पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच यश मिळाले.
Vinod Tawde
Vinod Tawdesarkarnama

चंडीगड : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (AAP) चंडीगड महापालिका (Chandigarh Municipal Corporation) निवडणुकीत मुसंडी मारत सर्वाधिक जागा पटकावल्या होत्या. मागील वेळी सत्तेत असलेल्या भाजपला (BJP) आपने दुसऱ्या क्रमांकावर फेकले होते. आता दुसऱ्या क्रमांकावर असूनही भाजपने `आप`ला धक्का देत आज महापौरपद मिळवले आहे. भारतीय जनता पक्षाने चंडीगड येथे प्रभारी म्हणून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांना नेमले आहे. तावडे यांना निवडणुकीत यश मिळाले नसले तरी त्यांनी महापौरपद पक्षाला मिळविण्याची `जादू` केली.

Vinod Tawde
बिगुल वाजला! उत्तर प्रदेशात 7 टप्पे, मणिपूर 2 तर पंजाब, गोवा, उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान

या महापौर निवडीचा परिणाम पंजाबच्या आगामी विधानसभा निवडणुकीवरही पडेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत काॅंग्रेसचे सात आणि अकाली दलाचा एक असे आठ नगरसेवक तटस्थ राहिले. या निवडणुकीत काॅंग्रेसची कोंडी झाली. कारण भाजपला हरविण्यासाठी ते `आप`ला मतदान करू शकत नव्हते. भाजपचे तेरा नगरसेवक होते. पण तेथील भाजपच्या खासदार किरण खेर या महापालिकेच्याही सदस्य असतात, असा नियम भाजपने दाखवला. त्यामुळे भाजपला तेरा सदस्य निवडून आलेले असताना चौदा मते मिळाली. भाजपच्या नगरसेवकांची संख्या आधीपेक्षा घटली असली तरी महापौर निवडीचे श्रेय त्यांना मिळू शकते.

या चुरशीच्या निवडणुकीत भाजपच्या सरबजीतकौर या महापौर झाल्या. त्यांना २८ पैकी १४ नगरसेवकांची मते मिळाली. या निवडणुकीवेळी `आप`चे नगरसेवक गोंधळ करताना दिसून आले. `आप`च्या महापौरपदाच्या उमेदवाराला १३ मते मिळाली. एक मत अवैध ठरवण्यात आल्याने भाजपचा उमेदवार केवळ एका मताने जिंकला. भाजपने या निवडणुकीत काळाबाजार केल्याचा आरोप `आप`ने केला आहे. आपच्या नगरसेवकांचा गोंधळ वाढू लागल्यानंतर अखेर पोलिसांना बोलवावे लागले.

Vinod Tawde
योगी, ओवैसींसाठी निवडणूक आयुक्तांचा इशारा : भडकविणारी भाषणे केल्यास...

मागील महापालिका निवडणुकीत भाजपने 20 जागा मिळवल्या होत्या. त्यावेळी भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या अकाली दलाला एक जागा मिळाली होती. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर अकाली दलाने भाजपसोबतची आघाडी तोडली होती. काँग्रेसला मागील निवडणुकीत 4 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने त्या सातवर नेल्या होत्या.

चंडीगडमध्ये दर पाच वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत दरवेळी दिसून येते. या वेळी मात्र अपवाद झाला असून, `आप`ने मुसंडी मारली होती. पंजाबमधील विधानसभा निवडणुका काही आठवड्यांवर आलेल्या असताना `आप`ने आपली ताकद दाखवून दिली. यामुळे भाजपसह काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीत आप, भाजप, काँग्रेस, अकाली दल - बहुजन समाज पक्ष आघाडी अशी चौरंगी लढत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com