आमदार विनोद अगरवाल यांनी 'मविआ'तून 12 दिवसांत मारली उडी; भाजपचे 1 मत प्लस

Vinod Agrawal | BJP | : राज्यसभेला महाविकास आघाडीसोबत, विधान परिषदेला भाजपसोबत
Vinod Agrawal
Vinod Agrawal Sarkarnama

मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या मतदानासाठी अवघे काही तास उरले आहेत. मात्र त्यापूर्वी फोेडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. भाजपला (BJP) आपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी तब्बल 21 मतांची गरज आहे, तर महाविकास आघाडीला सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी 9 ते 10 मतांची गरज आहे. त्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांचे महत्व कमालीचे वाढले आहे.

अशातच महाविकास आघाडीच्या गोटातील अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी पुन्हा एकदा उडी मारली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची सर्व आमदार आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हॉटेल ताजमध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उद्या कशा पद्धतीने मतदान करायचं याची रणनीती ठरवण्यात आली. याशिवाय भाजप आमदारांना व्हीप देखील लागू करण्यात आला आहे. याच बैठकीला विनोद अग्रवाल यांनीही उपस्थिती लावली होती. (Mahavikas Aghadi Latest Marathi News)

मात्र विनोद अग्रवाल यांनी राज्यसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहिर केला होता. याशिवाय 7 जुन रोजी महाविकास आघाडीकडून मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या शक्तीप्रदर्शनावेळीही त्यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळेच आमदार अग्रवाल यांनी अवघ्या 12 दिवसांमध्ये महाविकास आघाडी सोडत भाजपच्या अधिकृत बैठकीला उपस्थिती लावली आहे. त्यामुळे भाजपचे 1 मत वाढले आहे. (Bjp Latest Marathi News)

दरम्यान, चार उमेदवार निवडून आल्यानंतर भाजप, त्यांचे मित्रपक्ष, संलग्न अपक्ष या सर्वांची मिळून फक्त पाच मते शिल्लक राहतात. आपला पाचवा उमेदवार अर्थात प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी त्यांना आणखी 21 मतांची बेगमी करावी लागणार आहे. यात आता अगरवाल यांचे एक मत नक्की समजले जात आहे. (Vidhan Parishad Election Latest News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com