विनायक राऊतांचा आम्हाला भयानक त्रास; त्यांची उचलबांगडी मागच्या अधिवेशनातच ठरली होती

Vinayak Raut | Shivsena | पार्लमेंटचा रेकॉर्ड काढून बघितला तर ही गोष्ट लक्षात येईल.
Vinayak Raut
Vinayak Raut Sarkarnama

मुंबई : खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यापासून आम्हाला प्रचंड त्रास होता. सर्व खासदारांचा विनायक राऊतांवर रोष होता. त्यामुळे त्यांना हटवण्याची कारवाई मागच्या अधिवेशनातच होणार होती. पण झाली नाही. त्यामुळे आता त्यांना गटनेते पदावरून हटवले आहे, असे सांगत रामटेकचे खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे खासदारांमध्ये संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्याविरोधात असलेली धुसफूस मागील अनेक दिवसांपासून असल्याचे स्पष्ट होत आहे.

खासदार तुमाने म्हणाले, आमच्या गटात सध्या १२ आमदार आहेत, ते लवकरच १५ होतील. कारण आम्हाला गटनेता बदलवायचा होता. विनायक राऊत यांच्यापासून आम्हाला प्रचंड त्रास होता. सभागृहामध्ये कोणत्याही बिलावर बोलण्याची वेळ यायची, तेव्हा विनायक राऊत आमची नावे पाठवून द्यायचे आणि आमची बोलायची वेळ यायची, तेव्हा मात्र स्पिकर दुसऱ्यांचे नाव जाहीर करायचे. त्यामुळे आम्हाला कळतच नव्हते.

पार्लमेंट्री कमिटीच्या बुधवारच्या बैठकीत कोण केव्हा बोलणार यावर चर्चा होऊन ठरविले जायचे. पण बोलायच्या वेळी ते स्वतः किंवा अरविंद सावंत दोघेच बोलायचे. इतरांना बोलण्याची संधीच मिळत नव्हती. पार्लमेंटचा रेकॉर्ड काढून बघितला तर ही गोष्ट लक्षात येईल. हा इतर सर्व खासदारांवर मोठा अन्याय होत होता.

गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता आणि नंतर नंतर तर बुधवारची बैठक घेणेही त्यांनी बंद केले होते. त्यामुळे सर्व खासदारांचा विनायक राऊतांवर रोष होता. त्यामुळे त्यांना हटवण्याची कारवाई मागच्या अधिवेशनातच होणार होती. पण झाली नाही. त्यामुळे आम्ही आता त्यांना गटनेते पदावरून हटवले आहे, असा गौप्यस्फोटही खासदार तुमाने यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in