Vinayak Raut : किती वर्ष उद्धव ठाकरेंची भांडी घासणार ; राणेंचे राऊतांना सडेतोड उत्तर

Shashikant Warise Case : खासदार विनायक राऊत यांनी वारीसे यांच्या कुटुंबियांच्या भेट घेतली.
Shashikant Warise Case NEWS
Shashikant Warise Case NEWS sarkarnama

Shashikant Warise Case : पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूवरुन सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी (SIT)स्थापना करण्याची घोषणा केली आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत फडणवीसांना पत्र लिहिले होते.

आज (शनिवारी) रत्नागिरी येथे ठाकरे गटाचे नेते, खासदार विनायक राऊत यांनी वारीसे यांच्या कुटुंबियांच्या भेट घेतली. नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी आज रत्नागिरी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात विनायक राऊत सहभागी झाले. यावेळी राऊतांनी राणे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले.

"वारीसे यांचा अपघात करणारा हा नीलेश राणे आणि नारायण राणे यांच्यासोबत राहणारा गुंड आहे. त्यांच्या चिथावणीखोरीमुळे वारीसे यांच्यासारख्या पत्रकारांची हत्या करण्यात येत आहे." असा आरोप राऊत यांनी राणेंवर केला आहे. तर याप्रकरणी निलेश राणे यांनी देखील ठाकरे गटावर पलटवार केला आहे.

Shashikant Warise Case NEWS
Shashikant Warise : वारीसे मृत्यू प्रकरणी शिंदे-फडणवीसांचा मोठा निर्णय ; पोलिसांना दिला 'हा' आदेश

वारीसे यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत भेटीगाठी होत असल्याचा आरोप करत निलेश राणे यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे.

"मला विनायक राऊत यांना एक प्रश्न विचारायचा आहे की, हाच आरोपी एक-दीड महिन्यांपूर्वी कलेक्टर ऑफीसमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत उपस्थित होता की नाही, रिफायनरीच्या किती मीटिंगमध्ये हा व्यक्ती आणि साळवी भेटले, आणि मागच्या वर्षभरात कितीदा भेट झाली, याचा राजन साळवी आणि विनायक राऊत यांनी खुलासा करावा, असे निलेश राणे म्हणाले.

निलेश राणे म्हणाले, "राणेंवर टीका केल्यावर उद्धव ठाकरे खुश होतात म्हणून विनायक राऊत टीका करत आहेत. त्यांची खासदारकीची कामे संपली आहे असं वाटतंय. आता किती वर्ष उद्धव ठाकरेंची भांडी घासणार आहे?"

याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे त्याला सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर गंभीर आरोप केला आहे.

संजय फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे, याबाबत राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वारीसे प्रकरणात आम्ही (शिवसेना) आवाज उठवू नये, म्हणून मला धमकी देण्यात आली आहे. 'तुमचाही शशिकांत वारीसे करु,'अशी धमकी दिल्याचे राऊतांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com