Devendra Fadnavis News : 'एक ना धड भाराभर चिंध्या'; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Thackerey Group vs BJP : ठाकरे गट-भाजपमध्ये कलगीतुरा सुरूच
Devendra Fadnavis, Vinayak Raut
Devendra Fadnavis, Vinayak RautSarkarnama

Maharashtra Politics : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी शिंदे गटासह भाजपमधीलही काही आमदार गुडघ्याला बांशिंग बांधून बसल्याचे दिसून येत आहे. यात काही अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी अनेकांना आशा होती. ती मात्र फोल ठरली. त्यामुळे सत्ताधारी पक्षांतील ९ खासदार आणि २२ आमदार अस्वस्थ झाले आहेत. त्यातील काही ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपर्कात असल्याचाही दावा केला ठाकरे गटाकडून केला जात आहे. यावर फडणवीसांनी ठाकरे गटाचा चांगलाच समाचार घेतला.

Devendra Fadnavis, Vinayak Raut
Imtiaz Jalil On Mp Balu Dhanorkar : `बाळा`, तुझी खूप आठवण येईल, धानोरकरांच्या निधनाने इम्तियाज जलील भावूक..

उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली. फडणवीस म्हणाले, "आजच्या घडीला ठाकरे गटाइतका कुठलाही पक्ष असंतुष्ट नाही. ठाकरे गटातील तीन-चार जण इतके असंतुष्ट आहेत की त्यांच्यामुळेच संपूर्ण गटात अस्वस्थता पसरली आहे. पोपट मेलाय हे सर्वांना माहिती आहे. मात्र कार्यकर्त्यांतील उत्साह वाढविण्यासाठी ठाकरे गटाकडून सतत अशी वक्तव्य केली जात आहेत. येत्या काही दिवसांत समजेल की कुठल्या गटात जास्त अस्वस्थता आहे."

Devendra Fadnavis, Vinayak Raut
Devendra Fadnavis News : फडणवीसांची ठाकरे गटावर बोचरी टीका; म्हणाले, "तीन-चार लोकांमुळे..."

फडणवीसांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी खरमरीत टीका केली. भाजपमध्ये सध्या एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार सुरू असल्याचे राऊत म्हणाले. विनायक राऊत म्हणाले, फडणवीसांनी ठाकरे गटाची चिंता आजिबात करू नका. तुमचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) एकीकडे एक बोलतात. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) दुसरीकडे तिसरेच बोलतात. त्यामुळे तुमच्या पक्षात 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशी आवस्था झाली आहे."

Devendra Fadnavis, Vinayak Raut
Maan News: पडळकरांना महापुरुषांबद्दल खोटा कळवळा; राजमातांचा अवमान होताना ते गप्प का...

राऊत यांनी शिंदे गटालाही यावेळी लक्ष्य केले. शिंदे गटामुळे भाजपला पनवती लागली आहे, असे राऊतांनी सांगितले. विनायक राऊत म्हणाले, फडणवीसांनी भाजपवर लक्ष द्यावे. शिंदे गटामुळे भाजपला उतरती कळा लागली आहे. शिंदे गटाला बरोबर घेतल्यानतंर भाजपला जी पनवती लागलेली आहे त्याची फडणवीसांनी आधी काळजी करावी." दरम्यान, खासदार संजय राऊत यांनीही भाजप सरकारचा समाचर घेतला. भाजपच्या केंद्र सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात लोकांच्या नाकीनऊ आल्याची टीका केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com