Lokneta Vinayakrao Mete Vikas Aghadi: मोठी बातमी : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या नेत्याच्या नावाने नवीन पक्ष ..

Maharashtra Politics : बीड जिल्ह्यातील त्यांच्या घरच्या पत्त्यावरच या पक्षाची नोंदणी करण्यात आली आहे.
Vinayak Mete
Vinayak MeteSarkarnama

Lokneta Vinayakrao Mete Vikas Aghadi : राज्यात सध्या विधानसभा,लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.

लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका एकाच वेळी होण्याचे शक्यता काही नेत्यांनी व्यक्त केली आहे. आगामी विधानसभेसाठी राज्य पातळीवरील पक्षांनी निवडणुकीच्या जोरदार तयारी केल्याचे दिसते.

Vinayak Mete
Prakash Ambedkar : "पवारांचा कित्ता भुजबळांनी गिरवावा ; आंबेडकरांनी करुन दिली ही आठवण..

मराठा आरक्षणासाठी नेतृत्व केलेले दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या नावानेही नवीन पक्षाची नोंदणी केली आहे. मेटे यांच्या बीड जिल्ह्यातील घरच्या पत्त्यावरच या पक्षाची नोंदणी करण्यात आली आहे.

लोकनेते विनायकराव मेटे विकास आघाडी (बीड), असे या पक्षाचे नाव आहे. मेटेंच्या घरच्या पत्त्यावर या पक्षाचा पत्ता आहे. १४ आँगस्ट २०२२ रोजी मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला.

Vinayak Mete
Kiran Kale : आत्मदहनाचा इशारा देणारे काँग्रेस शहराध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात ; अहमदनगर रस्ते गैरव्यवहार..

विनायक मेटे यांना सर्वप्रथम विधान परिषदेवर संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नगर विकास पक्ष स्थापन केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी त्यांचा पक्ष राष्ट्रवादीमध्ये विलीन केला होता.

राष्ट्रवादीमध्ये असतानाच त्यांनी शिवसंग्राम संघटनेची स्थापना करून मराठा आरक्षण आणि शिवस्मारक उभारणीसाठी आंदोलने केली. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मेटेंनी भाजपला मदत केली. 2014 ची विधानसभा निवडणूक त्यांनी बीड विधानसभा मतदारसंघातून लढवली होती.

Vinayak Mete
BJP News : शिरुर भाजपचे दोन तालुकाध्यक्ष कोण ? ; इच्छुकांच्या आज..

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. भाजपने त्यांना शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद दिले होते. त्यांची पुन्हा विधान परिषदेवर निवड करण्यात आली होती. 2022 पर्यंत ते विधान परिषदेचे आमदार होते.

विनायक मेटे हे मराठा समाजासाठी लढा देणारे लढवय्ये नेते म्हणून ओळखले गेले. मराठा क्रांती मूक मोर्चा आयोजनामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती.आधी काँग्रेस आणि नंतर भाजपसोबत त्यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम केले. (Latest Marathi News)

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com