भाजपनं शब्द देऊनही उमेदवारी दिली नाही! मेटेंनी टाकला बॉम्ब

भाजपने (BJP) विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
Vinayak Mete
Vinayak Metesarkarnama

मुंबई : भाजपने (BJP) विधानपरिषदेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर भाजपच्या घटकपक्षांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे दिसून येत आहे. शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने आम्हाला काय फक्त वापरुन घेतले का? असा सवाल मेटेंनी केला. (Vinayak Mete Latest Marathi News)

मेटे यावेळी म्हणाले, आम्ही प्रामाणिकपणे भाजपच्या सोबत आहोत, असे असताना आम्हाला शब्द देऊन सुद्धा उमेदवारी दिली नाही. विधान परिषदेवर तुम्हाला आम्ही शंभर टक्के उमेदवारी देणार असे सांगितले होते. मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांचा उपयोग झाला की मध्येच टाकून द्यायचे असी तर काही निती भाजपची नाही ना, असा सवाल मेटे यांनी उपस्थित केला. भाजपच्या सत्तेच्या काळात सुद्धा मंत्रीपदाची संधीही मिळाली नव्हती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती, असेही मेटे म्हणाले.

Vinayak Mete
यादी जाहीर होताच दरेकर पोचले चंद्रकांतदादांच्या भेटीला

भाजपने फक्त शिवसंग्रामवरच अन्याय केला. तिकीट वाटप, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि विधान परिषदेला आम्हला डावले. आम्ही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपवर विश्वास ठेऊन काम केले. मात्र, आजची नावे पाहता आम्हला धक्का बसला आहे. मी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष आणि दोन आमदारांना घेऊन फडणवीस आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेणार असल्याचे मेटे यांनी सांगितले.

Vinayak Mete
विधानपरिषद निवडणूक : खोत-मेटेंचा पत्ता कट; भाजपने मित्रपक्षांच्या तोंडाला पुसली पानं

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यामध्ये प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांना संधी दिली. तर, विनायक मेटे तसेच रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत यांना डावलले आहे. त्यानंतर विनायक मेटेंनी उघड नाराजी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com