शिंदे सरकारमध्ये संधी मिळण्यासाठी विनायक मेटेंचे सूचक विधान; खारीला विसरू नका...

Vinayak mete | विनायक मेटे यांचा जन्मदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे पार पडला.
Vinayak mete |
Vinayak mete |

मुंबई : 'गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठा समाजाच्या मागणीकडे कोणीही लक्ष दिलं नाही. तुम्ही तुमच्या सरकारमध्ये त्यांच्या मागण्यांकडे लक्षच दिलं नाही, त्यांना आरक्षण देण्याचंही काम तुम्ही केलंत. मागचं नालायक सरकार होतं. त्यांनी एकही समाजाला न्याय दिला नाही. पण आपल्याला कोणी न्याय देणारं कोणी असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत,' अशा शब्दात भाजप (BJP) आमदार विनायक मेटे यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) कौतुकाचा वर्षाव केला.

शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचा जन्मदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे पार पडला. या सोहळ्याला उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, आशिष शेलार आणि इतर भाजप नेते उपस्थित आहेत. मेटे यांनी या कार्यक्रमातून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत मेटे यांना संधी न मिळाल्यामुळे ते नाराज होते. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आगामी काळात संधी मिळावी यासाठी, आजचा अभिष्टचिंतन सोहळा असल्याची चर्चा आहे.

Vinayak mete |
विजय औटींचे ठरले : उद्धव ठाकरेंच्या बरोबरच राहणार

त्यांनी ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण यांनी घालवलं, असा आरोपही यावेळी मेटेंनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत यांचा आम्हाला आदर आहे, पण आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री आहात.अडीच वर्षे तुम्ही भेटले नाहीत, पण रात्री वेशांतर करून तुम्ही रणनीती करायचा. शेवटी तुम्ही स्वतःचं सरकार आणून दाखवलं. आपल्याला कोणी न्याय देणारं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. मी या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये अनेक वेळा मोर्चे काढले, पण उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अशोक चव्हाण यांनी लक्ष दिलं नाही.

माझी विनंती आहे की, शिंदे साहेब आणि तुम्ही मिळून राज्य मागासवर्गीय आयोगाला पत्र लिहा आणि निधी आम्ही गोळा करू. तुमच्या बद्दल आम्हाला खात्री आहे. तुम्ही शब्द दिला होता सरकारमध्ये घेण्याचा ते जरी पाळले नसतील तरी आम्ही तुमच्या सोबत असू. 2014 मध्ये सत्ते मधून मी विरोधी पक्षात गेलो. तुम्ही आम्हाला न्याय दया, अन्याय द्या पण आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहोत आम्ही वेडे मराठे आहोत. असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

Vinayak mete |
पारनेरच्या नगराध्यक्षपदासाठी विजय औटींचे नाव आघाडीवर

तुम्ही श्रीरामासारखे अनेक विकासाचे पूल बांधाल आणि त्यात खारीचा वाटा शिवसंग्रामचा असणार आहे. पण त्या खारीला विसरू नका, त्याला नेहमी जवळ ठेवा, अशी विनंतीही मेटे यांनी केली. पण शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने तुम्ही सत्ता चालवताय. पण मागच्या अडीच वर्षात 5 मिनिट सुद्धा शिवाजी महाराज यांच्या समुद्रातील पुतळ्याच्या आढावा बैठकीला वेळ दिला नाही, असा आरोप विनायक मेटे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in