Vinayak Mete यांच्या गाडीचा पाठलाग करणारा पोलिसांच्या ताब्यात

Vinayak Mete : मेटेंच्या या निधनावर त्यांची पत्नी, नातेवाईक तसंच कार्यकर्त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
Vinayak Mete
Vinayak MeteSarkarnama

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी पोलीस महासंचालकाना रजनीश सेठ यांना शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. रविवारी (ता.१४) पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.(Vinayak Mete accident case)

मेटेंच्या या निधनावर त्यांची पत्नी, नातेवाईक तसंच कार्यकर्त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याने विनायक मेटेंच्या गाडीचा दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा केला होता.विनायक मेटे यांच्या निधनानंतर काही प्रश्न उपस्थितीत झाले आहेत.

मेटेंच्या अपघातापूर्वी 3 ऑगस्टला पुणे एक्स्प्रेसवर शिक्रापूरजवळ एका गाडीने त्यांचा पाठलाग केला होता. त्यांचा ड्रायव्हर चालक समाधान वाघमारे याने शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा त्यामधून बरंच काही बाहेर येईल, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी त्या कारचालकाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Vinayak Mete
Ghulam Nabi Azad : काँग्रेसची ऑफर ठोकरली ; काही तासातच राजीनामा, बंडखोरीच्या तयारीत ?

विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या गाडीचा मालक कम चालकाचं नाव संदीप विर आहे, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस त्याची चौकशी करीत आहेत. 3 तारखेला या गाडीच्या चालकासोबत 6 जण होते. 6 जणांपैकी एकाचा वाढदिवस असल्यामुळे ते शिरूरला गेले होते, तसंच शिरूरमध्ये त्यांचे नातेवाईक असल्याकारणामुळे ते तिकडे गेले होते, असं पोलीस तपासात समोर आलं आहे.

अपघात घडला त्या दिवशी टोलनाक्यावरून गाडी गेली होती त्यामध्ये विनायक मेटे दिसत नव्हते, असा दावा मेटे यांच्या भाच्याने केला आहे.चालक एकनाथ कदम (eknath kadam) याच्यावरही संशय व्यक्त केला आहे. ड्रायव्हर वारंवार विधानं बदलत आहे, असा दावाही मेटेंचे भाचे विनायक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

मेटे यांची पत्नी डॉ.ज्योती मेटे यांनीही मेंटेंच्या अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.ज्योती मेटे म्हणाल्या, "मेडिकल टर्मोनॉलॉजीनुसार मृत्यूनंतर एवढ्या लगेच चेहरा पांढरा पडत नाही, काही काळानंतर चेहरा पांढरा पडायला सुरूवात होते, पण साहेबांचा चेहरा अतोनात पांढरा पडला होता,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com