विनायक मेटे अपघात प्रकरण; 'सीआयडी'च्या तपासात नवी माहिती समोर; चालकाला अटक

Vinayak mete News : विनायक मेटे यांच्या चालकाला पोलिसांनी अखेर अटक केली...
Vinayak Mete
Vinayak MeteSarkarnama

Vinayak mete News : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak mete) यांचं काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झालं होतं. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मेटे यांच्या गाडीच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आज अखेर चालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आलीय.

मेटे यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर १४ ऑगस्टला अपघात झाला होता. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना नवी मुंबईच्या एमजीएम (MGM) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. या अपघातामध्ये त्यांच्या गाडीचाही चक्काचूर झाला होता.

Vinayak Mete
Abdul Sattar : राज्यातील १६ लाख शेतकऱ्यांना ६२५ कोटींची विमा नुकसान भरपाई..

या घटनेनंतर मेटे यांच्या अपघाताचा सीआयडीमार्फत (CID) तपास करण्यात आला. या तपासानंतर मेटे यांच्या गाडी चालकावर रसायनी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज मेटे यांच्या चालकाला पोलिसांनी अखेर अटक केली. या अटकेनंतर चालकाला खालापूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Vinayak Mete
Crime : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आफताबचा डॅाक्टरचं ठरणार महत्वाचा पुरावा...

एकनाथ कदम असे मेटे यांच्या गाडी चालकाचे नाव आहे. घडलेल्या अपघाताच्या घटनेत चालकाची चुकी असल्याचं सीआयडीच्या तपासात समोर आलंय. चालकाने अतिवेगाने गाडी चालवल्यामुळेच अपघात झाल्याचं सीआयडीच्या तपासात समोर आलंय. तसेच चालकाकडून कुठलेही वाहतुकीचे नियम पाळण्यात आले नव्हते, अशी माहीती समोर आलीय. दरम्यान, या सर्व घटनेचा सीआयडीमार्फत (CID) तपास करण्यात आल्यानंतर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com