ब्रिजभूषण यांच्या धमकीला मनसेची केराची टोपली; राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची अशी आहे तयारी...

मुंबईतून काही उत्तर भारतीय सुद्धा राज ठाकरे यांच्या सोबत अयोध्येला जाणार...
Raj Thackeray, Brij Bhushan Sharan Singh, Yogi Adityanath
Raj Thackeray, Brij Bhushan Sharan Singh, Yogi AdityanathSarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जूनला अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याच्या तयारीची लगबग जोरात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि कार्यकर्त्यांच्या वारंवार बैठकाही होत असून तयारीचा आढावा घेतला जात आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून किती कार्यकर्ते अयोध्येला जाणार, त्यासाठी किती ट्रेन लागणार, कोणत्या विभागातून किती गाड्या निघणार आदी बाबींचा आढावा घेतला जात आहे.

दरम्यान राज्यातून सुमारे १५ हजार मनसे कार्यकर्ते हे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये काही उत्तर भारतीय कार्यकर्तेंचाही राज यांच्या अयोध्या दौऱ्यात समावेश असल्याची माहिती मिळत आहे. (Raj Thackeray's Ayodhya Visit Marathi Latest News)

Raj Thackeray, Brij Bhushan Sharan Singh, Yogi Adityanath
राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द : मुंबईकडे रवाना

राज ठाकरे यांचा बहुचर्चीत अयोध्या दौऱ्यासाठी मुंबईतून मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी मुंबईतील मनसेच्या प्रत्येक विभाग अध्यक्षाने रेल्वेची एक बोगी बुक केली असून लोकांची शाखानिहाय नोंदणी सुरू आहे. मुंबईत मनसेचे एकूण ३६ विभाग अध्यक्ष आहेत. या सर्वांनी अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु केलेली आहे.

मनसेच्या अयोध्या दौऱ्यासाठी मुंबईतून चार ट्रेन जाणार तर ठाणे, रायगड, पुणे, नाशिक येथून सहा ट्रेन जाणार आहेत. औरंगाबाद, नागपूर आणि अन्य जिल्ह्यातून रेल्वे बुकिंग सुरू असून आतापर्यंत एकूण 12 ट्रेनचे मनसेकडून बुकिंग झाले आहे. तर मुंबईतून बोरिवली विभागातून 100 गाड्या अयोध्येला जाणार आहेत. तसेच, मुंबईतल्या वेगवेगळ्या विभागातून अशाच पद्धतीने गाड्या जाणार आहेत. काही पदाधिकारी हे रोडने 5 जून आधीच अयोध्येत दाखल होणार असून या दौऱ्यात सुमारे 15 हजार लोक अयोध्येला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Raj Thackeray, Brij Bhushan Sharan Singh, Yogi Adityanath
Subhash Desai : उद्धव ठाकरेंची औरंगाबादेत `मास्टर सभा`, मैदान अपुरं पडेल..

राज यांच्या या अयोध्या दौऱ्यात मनसेच्या दाव्यानुसार मुंबईतील अनेक उत्तर भारतीयांचाही समावेश आहे. त्यामुळे राज यांच्या या दौऱ्याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. तर 15 जून रोजी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही अयोध्याला जाणार आहेत. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, आयोध्येतील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी नतंरच त्यांना अयोध्येत प्रवेश, अशी भूमिका कायम ठेवल्याने राज यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com