Rahul Narvekar On Raut : '' संजय राऊतांचा अभ्यास कमी,त्यांना जनतेनं...''; राहुल नार्वेकरांचा चिमटा

Maharashtra Politics: संजय राऊत हे याआधी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागत होते. आता ते...
Rahul Narvekar On Raut : '' संजय राऊतांचा अभ्यास कमी,त्यांना जनतेनं...''; राहुल नार्वेकरांचा चिमटा

Mumbai : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राज्यातील १६ आमदार अपात्रतेचं प्रकरण माझ्या हातात येईल असं म्हणाले होते. यावर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत नार्वेकरांवर निशाणा साधला होता. राहुल नार्वेकरांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्या असं आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे. यावर आता नार्वेकरांनी राऊतांना चिमटा काढला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांनी मंगळवारी(दि.१०) संजय राऊतांच्या आरोपांना पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहेत. नार्वेकर म्हणाले, बिनबुडाच्या आरोपावर उत्तर देण्याची गरज नसते. संजय राऊत हे अनेकवेळा मुख्यमंत्री यांचा राजीनामा मागत होते. आता ते थेट अध्यक्षांचा राजीनामा मागत आहेत. संजय राऊत यांचा अभ्यास कमी असल्यानेच त्यांच्याकडून बेजबाबदार वक्तव्य केले जात आहेत, जनतेने त्यांना माफ करावं असा टोला नार्वेकरांनी राऊतांना लगावला आहे.

Rahul Narvekar On Raut : '' संजय राऊतांचा अभ्यास कमी,त्यांना जनतेनं...''; राहुल नार्वेकरांचा चिमटा
Supreme Court Hearing on Maharashtra Political Crisis: ...तर धनुष्यबाण आणि शिवसेना पुन्हा ठाकरेंना मिळेल; असीम सरोदेंचे मोठे विधान

संजय राऊत टाइमकीपरची...

अध्यक्ष केवळ संविधानाने दिलेली माहिती देत आहेत. संजय राऊत टाइमकीपरची भूमिका बजावत आहेत. कायदे मंत्री मुंबईला आले होते. ती केवळ औपचारिक भेट होती. राज्यात अनेक महत्वाचे प्रश्न आहेत, इतर प्रश्नाकडे लक्ष देणं गरजेच आहे असंही नार्वेकर यावेळी म्हणाले.

राऊतांचा संविधानिक अभ्यास कमी...

संजय राऊतांचा संविधानिक अभ्यास कमी आहे. माझा कायद्याचा अभ्यास आहे. मला स्पष्ट दिसून येत की, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ प्रत्येकाला आपल्या जबाबदारी वाटून दिलेल्या आहेत. विधीमंडळाला जे अधिकार दिले आहेत ते संविधानिक अधिकार आहेत, यामध्ये कोणतीही एजन्सी हस्तक्षेप करणार नाही.

सर्वोच्च न्यायालयात चिन्हविषयी निर्णय देताना न्यायालयाने सांगितलं की हा निर्णय निवडणूक आयोगाने द्यावा. विधिमंडळातील अधिकारावर कोणतीही गदा आणणार नाही याची मला खात्री आहे असा विश्वासही नार्वेकरांनी यावेळी व्यक्त केला.

Rahul Narvekar On Raut : '' संजय राऊतांचा अभ्यास कमी,त्यांना जनतेनं...''; राहुल नार्वेकरांचा चिमटा
Sanjay Raut News: संजय राऊतांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी न्यायालयाचा मोठा दिलासा; २० जूनपर्यंत सुनावणी लांबणीवर...

नार्वेकरांचा राऊतांना सल्ला...

जोपर्यंत अध्यक्ष निर्णय देत नाहीत, तोपर्यंत कोणतीही एजन्सी हस्तक्षेप करू शकत नाही. मी ज्या पदावर आहे त्याची गरिमा राखणं गरजेचं आहे. राज्यातील आणि देशातील जनतेने एखादं वक्तव्य वारंवार केलं तर जनता जास्त मनावर घेत नाही. त्यामुळे वक्तव्य करणाऱ्यांनी जबाबदारी बाळगून वक्तव्य करावं. संजय राऊत यांनी आपली जबाबदारी ओळखून वक्तव्य करावं असा सल्लाही नार्वेकरांनी राऊतांना दिला आहे.

झिरवळ असे पहिले आहेत की....

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ(Narhari Zirwal) यांनी कायद्याची तरतूद काय आहे, त्यावर आपलं म्हणणं मांडणं ठीक आहे. ते वरिष्ठ आहेत. त्यांच्यावर बोलणं योग्य नाही. पण झिरवळसाहेब असे पहिले आहेत की, त्यांना त्यांचा वकालतनामा कोर्टात सादर करावा लागला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in