नातीगोती, जुने 'राजकीय' संबंध जुळवा अन् किमान तीन मतं फोडा : आमदार लागले कामाला

Vidhan Parishad | NCP | Shivsena | Congress | : विधान परिषदेच्या रणधुमाळीत आमदारांची फोडाफोडी नक्की?
Vidhan Parishad Election 2022| BJP|
Vidhan Parishad Election 2022| BJP|Sarkarnama

मुंबई : भाजपचा संभाव्य दगाफटका, आघाडीतली कथित अस्वस्थता आणि आमदारांची नाराजी या सगळ्यामुळे राज्यसभा निवडणुकीनंतर कपाळाला हात लावलेल्या शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसने (Congress) आता मात्र भलतीच खबरदारी घेतली आहे. त्यामुळे 'पक्षाच्या आमदारांशिवाय स्वतःच्या ताकदीवर प्रत्येकी किमान तीन आमदार फोडून जिंकण्याचा आदेशच आपापल्या उमेदवारांना दिला असल्याचे समजते आहे. त्यामुळेच नातीगोती, जुने राजकीय 'कनेक्शन' जुळवून रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसेंच्या गोटात घडामोडी घडत आहेत. याचा परिणाम म्हणून एरवी विधान भवनात ठाण मांडणारे नाईक-निंबाळकरही आमदारांचे उंबरठे झिजवत आहेत. तर भाजपमधील जुन्या सहकाऱ्यांना गळाला लावण्याची खडसेंची धडपड आहे. (Vidhan Parishad Election Maharashtra latest News)

विधान परिषदेच्या मतदानापासून माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक हे लांब राहणार आहेत. तर शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाले आहे. त्यामुळे रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी २६ मतांची 'मॅजिक फिगर' गाठावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे आजघडीला हक्काची जेमतेम ५१ मते आहेत. खडसे आणि नाईक-निंबाळकरांच्या अपेक्षित कोट्यासाठी अजूनही एक मत कमी आहे. त्यातच भाजपकडून फोडाफोडाचा धोका असल्याने सर्वच पक्ष धास्तावले आहेत. त्यामुळे सुरक्षितता म्हणून एक ते दोन मत अतिरिक्त ठेवावी लागणार आहेत.

Vidhan Parishad Election 2022| BJP|
भाजपच्या डोक्यात खडसेंचा गेम? : नाथाभाऊंना आमदार करण्याचा अजितदादांचा निर्धार

तर खडसेंची राजकीय बळी घेण्याची भाजपची रणनीती उघड आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या निकालाने सावध झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने हरण्याची नामुष्की ओढावू नये यासाठी पक्षापलीकडे जाऊन किमान तीन मते फोडण्याबाबत बजावले असल्याचे समजते आहे. त्यामुळे खडसे, नाईक-निंबाळकर यांनी स्वतंत्रपणे गेली चार दिवस फिरून जोरदार फिल्डिंग लावत आहेत. त्यातून स्वपक्षाचा एकही आमदार सुटणार तर नाही शिवाय, विरोधी गटातलेही काही आमदार सापडण्याची आशा खडसे, नाईक-निंबाळकरांना आहे. (Vidhan Parishad Election Maharashtra latest News)

Vidhan Parishad Election 2022| BJP|
काँग्रेसच्या भाईंच्या आमदारकीचा फैसला शिवसेनेच्या हातात; ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची यंत्रणाला कामाला लागली होती. परंतु, विधान परिषदेच्या निवडणुकीत या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीपेक्षा स्व:पक्षाचे हित पाहून मार्चेबांधणी केल्याचे दिसत आहेत. शिवसेनेकडे दोन उमेदवारांसाठी पुरेशी मते असली; तरीही सचिन अहिर आणि आमशा पाडवींसाठी ते धोका पत्कारण्यासाठी तयार नाहीत. काँग्रेसला आपले दोन्ही उमेदवार निवडून आणायचेच आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसही घातकी राजकारणामुळे बेसावध राहिलेली नाही. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही महाविकास आघाडीतील घटक पक्षांना नामोहरण करण्याची भाजपची खेळी असून, त्यातून भाजपला पाचही उमेदवार जिंकून आणायचे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com