पंकजांना डच्चू दिल्यानंतर भुजबळाचं सूचक विधान ; खडसेंच्या बाबतीत तेच झालं होतं..

"उमेदवारीची संधी मिळाल्यास या संधीचं सोनं करेन," असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं.
Pankaja Munde, Chagan Bhujbal
Pankaja Munde, Chagan Bhujbalsarkarnama

मुंबई : भाजपने (BJP) आज विधानपरिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad)आपली यादी जाहीर केली. केंद्रीय समितीने पाच जणांची नावे निश्चित केली आहेत. यादीत मात्र पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं आहे. यावर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.

भाजपनं प्रवीण दरेकर (Praveen Darekar), माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde), श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya), उमा गिरीश खापरे (Uma Khapre), प्रसाद लाड (Prasad Lad) या पाच जणांची नावं जाहीर केली आहेत. यादीतून पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि विनोद तावडे (Vinod Tawde) यांना मात्र संधी देण्यात आलेली नाही.

विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण प्रत्यक्ष यादीत मात्र पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं. "उमेदवारीची संधी मिळाल्यास या संधीचं सोनं करेन," असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते, अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी पंकजा मुंडेंबाबत सूचक विधान केलं आहे. भूजबळ माध्यमांशी बोलत होते.

Pankaja Munde, Chagan Bhujbal
शेलारांनी राज ठाकरेंना दिले धन्यवाद ; म्हणाले, 'आमच्या विनंतीला मान..'

भूजबळ म्हणाले, "दिलेल्या संधीचं सोनं करेन,असे पंकजा मुंडेचं स्टेटमेंट वाचलं होत. पण त्यांना डावलण्यात आले. त्यांना पहिल्या क्रमांकावर उतरता आलं असतं.संधी द्यायला हवी होती,"

"एकनाथ खडसे यांच्या बाबतीत तेच झाले होते. पंकजा मुंडे यांना परत घेतलं जाईल असं वाटलं होतं. परंतु असं काही झालं नाही. याचा परिणाम हा लोकांवर व समाजावरही होत असतो," असे सूचक विधानही छगन भुजबळ यांनी केले.

भूजबळ म्हणाले, "भाजपने राज्यसभा निवडणूकीत उमेदवार दिला. मात्र आघाडीचे उमेदवार निवडून येतील, आता विधानपरिषदेच्या निवडणूकीतही तयारी करावी लागेल, कंबर कसावी लागेल. महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यसभेवर सर्व निवडून येतीलच आणि त्याच पावलावर पाऊल टाकून विधानपरिषदेतही आघाडीचे उमेदवार निवडून येतील,"

"राज्यसभा असो या विधानपरिषद असो यातील घोडेबाजाराला कोण बळी पडणार नाही. आमचे सर्व आमदार प्रामाणिक राहतील," असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com