vidhan parishad election 2022 : भाजपच्या गर्वाचे घर खाली होणार : नाना पटोले

गर्व, अतिमहत्वाकांक्षा, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन भाजप ही निवडणूक लढवत आहे. पण त्यांचे गर्वाचे घर खाली होणार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा मतदानास (vidhan parishad election 2022) प्रारंभ झाला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपचे आमदार विधानभवन परिसरात दाखल होत आहेत. "आम्हीच जिंकू," असा निर्धार महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांनी केला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे विधानभवनात दाखल झाले आहेत. मतदानापूर्वी त्यांच्याशी माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. "आमचे सहाही उमेदवार निवडून येतील. याबाबतचे रणनीती तयार केली आहे. भाजपसाठी हा गर्व उतविण्याचा हा दिवस आहे. गर्व, अतिमहत्वाकांक्षा, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन भाजप ही निवडणूक लढवत आहे. पण त्यांचे गर्वाचे घर खाली होणार आहे,"

Nana Patole
Vidhan Parishad Election : कोण मारणार बाजी ? अशी रंगणार लढत

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाने आपापले आमदार वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहेत. हे सारे आमदार या बसने विधानभवनात दाखल होत आहेत.

आज होणारी विधानपरिषद निवडणूक अधिक रंजक ठरणार आहे. कारण गुप्त मतदानाची पद्धत अवलंबली जाणार असून मते गुप्त ठेवण्यात येणार असल्याने ‘क्रॉस व्होटिंग’ होण्याची शक्यता बळावली आहे. त्याचबरोबर अपक्ष सदस्य कोणाला मतदान करतील याबाबतही साशंकता वाढली आहे.

भाजपने निवडणुकीत पाच उमेदवार उभे केले आहेत आणि त्यांच्या संख्येच्या बळावर चार जागा जिंकू शकतात, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केलेले प्रत्येकी दोन जागा जिंकू शकतात. मात्र, दोन उमेदवार उभे करणाऱ्या काँग्रेसला संख्याबळाच्या जोरावर एकच जागा जिंकता आली. दुसरी जागा जिंकण्यासाठी अपक्ष आणि लहान पक्षांचा पाठिंबा मिळवावा लागेल.

पक्षनिहाय उमेदवार

भाजप : प्रवीण दरेकर, राम शिंदे,श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड

राष्ट्रवादी : एकनाथ खडसे, रामराजे नाईक-निंबाळकर

शिवसेना : आमशा पाडवी, सचिन अहिर

काँग्रेस : चंद्रकांत हंडोरे ,भाई जगताप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com