Vidhan Parishad Election : कोण मारणार बाजी ? अशी रंगणार लढत

महाविकास आघाडीच्या विधान परिषद निवडणुकीची सूत्रे अजित पवारांकडे असल्याचे दिसते.
Vidhan Parishad Election 2022
Vidhan Parishad Election 2022 Sarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) भाजपचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. महाविकास आघाडीही पूर्ण तयारीने या निवडणुकीत उतरली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मात्र दिल्लीत गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विधान परिषद निवडणुकीची सूत्रे अजित पवारांकडे असल्याचे दिसते. (Vidhan Parishad Election latest news)

खडसे भाजपच्या टार्गेटवर

आज होत असलेल्या या विधानसभेच्या निवडणुकीत पहाटेपर्यंत डावपेच खेळले गेले. थोड्याच वेळात मतदानाला सुरवात होणार आहे.

नऊ ते चार ही मतदानाची वेळ असून सांयकाळी मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. १३ पक्ष आणि १६ छोटे पक्ष हे या निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहेत. काँग्रेसने शिवसेनेकडे पहिल्या पसंतीच्या 4 मतांची मागणी केली.राष्ट्रवादीचे उमेदवार मात्र सध्या निवांत आहेत. पण एकनाथ खडसे भाजपच्या टार्गेटवर आहेत

एकूण आमदार २८५,

मतांचा कोटा : २६

१० जागांसाठी ११ उमेदवार

इतर : २९ मते = अपक्ष १३, छोटे पक्ष १६,

अपात्र : ०३ मते = ०१ निधन, ०२ आमदार तुरुंगात

-शिवसेना ५५ मते, ७ अपक्षांचा पाठिंबा : २ जागा, १० मते जास्त

-राष्ट्रवादी ५१ मते :

०२ जागा, ०३ मतांची गरज

-काँग्रेस ४४ मते :

०२ जागा, ८ मतांची गरज

-भाजप १०६ मते :

०५ जागा, २९ मतांची गरज

पक्षनिहाय उमेदवार

भाजप : प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड

राष्ट्रवादी : एकनाथ खडसे, रामराजे नाईक-निंबाळकर

शिवसेना : आमशा पाडवी, सचिन अहिर

काँग्रेस : चंद्रकांत हंडोरे ,भाई जगताप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com