बीडचं राजकारण तापलं; ‘पुष्पा’ला टक्कर देण्यासाठी ‘डॉन’ची एन्ट्री

बीडचं राजकारणातील संघर्ष म्हटलं की मुंडे बहीण-भाऊ समोर येतात. पण आता क्षीरसागर कुटुंबही मागे राहिलेले नाही.
Yogesh Kshirsagar, Sandip kshirsagar
Yogesh Kshirsagar, Sandip kshirsagarSarkarnama

बीड : बीडचं राजकारणातील संघर्ष म्हटलं की मुंडे बहीण-भाऊ समोर येतात. पण आता क्षीरसागर कुटुंबही मागे राहिलेले नाही. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) आणि त्यांचे काका माजी आमदार जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांच्यातील संघर्ष दिवसागणिक वाढत चालला आहे. त्याची झलक नुकतीच पाहायला मिळाली. संदीप क्षीरसागर यांचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच बराच चर्चेत आला होता. एका जाहीर सभेत आमदार संदीप त्यांनी पुष्पा (Pushpa) चित्रपटातील `मै झुकेंगा नही`, हा डायलॉग म्हणत विरोधकांना इशारा दिला होता. त्यानंतर आता त्यांच्या सख्या चुलत भावाने त्यांना आव्हान दिलं आहे.

बीडमध्ये (Beed) क्षीरसागर काका-पुतण्यामधील राजकीय संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. हा वाद जगजाहीर असताना आता सख्खे चुलतबंधू आमनेसामने आले आहेत. आमदार संदीप यांच्या 'मै झुकेगा नहीं' या डायलॉगला त्यांचे चुलतबंधू नगरसेवक व शिवसेनेचे नेते योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) यांनी प्रत्युत्तर दिलं आङे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी 'मै हूं डॉन' हे गाणं गात आमदार संदीप यांनी डिवचलं आहे. यावेळी व्यासपीठावर जयदत्त क्षीरसागर हेही उपस्थित होते.

Yogesh Kshirsagar, Sandip kshirsagar
सरपंचासोबत उपसरपंचाचं ग्रामपंचायतीतच जमलं अन् वर्षभरात बँड..बाजा..बारात!

पुष्पानंतर आता बीडमध्ये डॉनची एन्ट्री झाल्याची चर्चा रंगली आहे. संदीप यांच्यासह योगेश यांचाही व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यामुळे बीडमध्ये नव्या पिढीतील राजकीय संघर्षाची ही चाहूल असल्याचे मानले जात आहे. या वादात एमआय़एमने उडी घेतली आहे. जिल्हाध्यक्ष शफिक शेख म्हणाले, पुष्पाला जंगलात पाठवू तर डॉनला हद्दपार करू. बीडमध्ये जंगलराज असल्याची टीका शेख यांनी केली आहे.

काय म्हणाले होते संदीप क्षीरसागर?

एका कार्यक्रमात बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले होते की, समोर बसलेल्या आयाबहिणींचे आशिर्वाद आणि तुमच्या सारखे कार्यकर्ते सोबत असल्यानंतर मला कशाची भिती नाही. नुकताच मी पुष्पा चित्रपट पाहिला. तस मला पिक्चर पहायला वेळ मिळत नाही, पण औरंगाबादला काही कामा निमित्त गेलो, वेळ होता तेव्हा पुष्पा पहायला गेलो. आज मला त्या हिरोसारखा डायलाॅग मारावासा वाटतो.

Yogesh Kshirsagar, Sandip kshirsagar
एकच शरीर असलेल्या जुळ्या भावंडांचं पहिलं मतदान ठरलं ऐतिहासिक

मला विरोधकांना सांगायचे की मै झुकेंगा नही. त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांनी एकच जल्लोष करत टाळ्या आणि शिट्या वाजवत भरभरून दाद दिली. आपल्या विरोधात सगळे एकत्र आलेत, पण आपल्याला त्याची भीती नाही. आयाबहिणीची, युवकांची साथ आणि थोरामोठ्यांचे आशिर्वाद पाठीशी आहेत. त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही, असेही क्षीरसागर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com