Sheetal Mhatre Viral Video: व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या पोरांना मध्यरात्री अटक; सभागृहात आव्हाड-देसाईंमध्ये खडाजंगी

Awhad Vs Desai: याप्रकरणी साईनाथ दुर्गे, अशोक मिश्रा, मानस कुवर, विनायक डायरे यांना गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
jitendra Awhad | Shambhuraj desai
jitendra Awhad | Shambhuraj desaiSarkarnama

Maharashtra Politics: अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणावरुन विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्षात मोठी खडाजंगी झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात १४ तरुणांना अटक झाली आहे. यावरुन आव्हाडांनी प्रश्न उपस्थित केले.त्याला उत्तर देताना मंत्री शंभुराज देसाई यांनी उत्तर दिले.

शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी बोलताना आव्हाड यांनी एसआयटी चौकशी लावल्याप्रकरणी सभागृहाचे आभार मानले. त्याचवेळी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले.'' कालपासून जवळपास १४ पोरांना अटक केली आहे.पण हा व्हिडीओ ओरिजिनल आहे की, मॉर्फ केलेला आहे याचा निर्णय तर येऊ द्या, पण मध्यरात्री दोन दोन वाजता लोकांच्या घरी जाऊन पोलीस त्या पोरांना अटक करत आहेत. पण त्या पोरांची चुकी काय आहे हे तर कळू द्या, आपण संवेदनशील होऊन उत्तर द्या, मुख्यमंत्री म्हणून असा आतंक बरा नाही, या तरुण पोरांचे आयुष्य उद्ध्वस्त होतयं. असं आव्हाड यांनी म्हटलं.

jitendra Awhad | Shambhuraj desai
Old Pension : विधानपरिषदेत पेटला जुनी पेन्शनचा मुद्दा; विरोधी सदस्य म्हणाले, चर्चा झालीच पाहिजे !

याला उत्तर देताना शंभुराज देसाई म्हणाले की, शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात आपण पाहिलं की काल शीतल म्हात्रे माध्यमांशी बोलताना रडू लागल्या, बोलता बोलता त्या निघून गेल्या. म्हणजे त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार झाला आहे. कुठल्याही स्त्रीमनाला हे मान्य होणार नाही. दोन वाजता पोरांना अटका झाल्या. मग त्यांना व्हिडीओ व्हायरल करताना काही वाटलं नाही का,आता पोलीस त्यांच काम करत आहेत. तपासात सर्व गोष्टी पुढे येतीलच. त्यामुळे पोलिसांना त्यांचं काम करुद्या.

शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) व्हिडीओप्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी (SIT) तपास करणार करणार आहे. या प्रकरणी सहा टीम कार्यरत करण्यात आल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली आहे. याप्रकरणी साईनाथ दुर्गे (Sainath Durge), अशोक मिश्रा, मानस कुवर, विनायक डायरे यांना गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

jitendra Awhad | Shambhuraj desai
Solapur News : सोलापुरातील बड्या नेत्याच्या मुलाने हिंदु गर्जना मोर्चात तलवार नव्हे; लाकडी दांडा फिरवला : पोलिसांचा तपासात दावा

दरम्यान, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याने अब्रुनुकसानीचा दावा करत दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मॉर्फ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून जनमानसात बदनामी केल्याचा आरोप राज यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिकारांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com