वेदांता प्रकल्प; विरोधकांच्या दबावानंतर एकनाथ शिंदेंची पंतप्रधान मोदींशी चर्चा

Vedanta Project| CM Eknath Shinde| वेदांता प्रकल्पासाठी कंपनीने महाराष्ट्राला प्रथम पसंती दिली आणि तसा अहवालही कंपनीच्या वतीने तयार करण्यात आला होता
Vedanta Foxconn Project| CM Eknath Shinde|
Vedanta Foxconn Project| CM Eknath Shinde|

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) येऊ घातलेला फॉक्सकॉन कंपनीचा 1. 54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षांच्या दबावानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, 'उद्योग प्रकल्प आणि गुंतवणुकीबाबत सहकार्य करण्याची मागणी आणि वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत चर्चा केल्याची माहितीही समोर आली आहे.

'वेदांता' ग्रुप व तैवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचे 60 : 40 असे जॉईन्ट व्हेंचर असणारा आणि महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण असणारा सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातला जाण्याच्या वाटेवर असून या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणुक राज्यात होणार होती. याप्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध होणार होता. हा प्रकल्पाच्या उभारणीसाठी कंपनीकडून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगाणा व आंध्र प्रदेश या राज्याबरोबर चर्चा करण्यात आली होती.

Vedanta Foxconn Project| CM Eknath Shinde|
1. 54 लाख कोटींची प्रक्लप गुजरातला; उद्योगमंत्री सामंत म्हणतात माहिती घेतोय

मात्र या कंपनीने महाराष्ट्राला प्रथम पसंती दिली आणि तसा अहवालही कंपनीच्या वतीने तयार करण्यात आला होता आणि त्याबद्दल महाविकास आघाडी सरकार असताना उद्योग विभागाशी बोलणी सुद्धा झाली होती. तसेच प्रकल्पाची जागा निवडीसाठी एकुण 100 मुद्दांचा विचार करून 'वेदांत' ग्रुपकडून तळेगांवातील टप्पा 4 ही जागा अंतिम करण्यात आले होती.

तसेच तळेगांवातील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ॲटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, जेएनपीटी बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्याने या कंपनीने तळेगांवात एक हजार एकर जागेची निवडही केली असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. आता याबाबत राज ठाकरे यांनीही आपलं मत व्यक्त करत हा प्रकल्प गुजरातमध्ये गेलाच कसा?, यावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. यामुळे यावर शिंदे-फडणवीस सरकार काय उत्तर देणार हे बघाव लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com