Vedanta Foxconn|पण शिंदे सरकारचे सर्व निर्णय दिल्लीतून होतात: सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Vedanta Foxconn|राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गणेश मंडळांना भेटी देणे, सत्कार घेणे आणि आमच्यावर टीका करणे याशिवाय कोणतही काम केलेलं नाही.
Vedanta Foxconn| Supriya Sule
Vedanta Foxconn| Supriya Sule

मुंबई : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेऊन केंद्र सरकारकडून महाराष्ट्र आणि मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राविरोधात दिल्लीतून कट शिजत आहे. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीसमोर कधीही झुकले नाहीत पण आज शिंदे सरकारचे सर्व निर्णय दिल्लीतून होत आहेत. सत्तेच्या स्वार्थासाठी महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस भरडला जातोय. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गणेश मंडळांना भेटी देणे, सत्कार घेणे आणि आमच्यावर टीका करणे याशिवाय कोणतही काम केलेलं नाही. अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

महाराष्ट्र सोडून इतर राज्याला प्रोजेक्क्ट मिळत असेल तर ठीक पण महाराष्ट्राचा प्रोजेक्ट तिकडे गेला त्यामुळे नोकऱ्या जाणार आहेत,राज्य सरकारला विनंती आहे विषय राजकीय करू नका,सर्वांनी एकत्रितपणे येऊन लढा, असही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर विरोधक- आणि सत्ताधाऱ्यामध्ये राजकारण तापलं आहे. विरोधकांकडून दबाव वाढल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीवरच आरोप केले आहेत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील राज्य सरकारवर टीकेचा आसुड ओढला आहे.

Vedanta Foxconn| Supriya Sule
वातावरण तापलं! म्हणून.. वेदांता प्रकल्प गुजरातला नेला: विरोधकांचा गौप्यस्फोट

''गुजरातच्या नेत्यांचा आशिर्वाद राहीला पाहिजे, म्हणून महाराष्ट्रातील भाजप नेते हे करताहेत मुख्यमंत्र्यांनी राज्याचं हस्तक असायला हवं, पण ते मोदी शहा म्हणतात तसं ऐकतात. आपल्या राज्याच्या वाट्याचं पाणी गुजरातला पाठवलं. उद्या मुंबईच गुजरातमध्ये गेली तर नवल वाटायला नको, असं नाना पटोले यांनी म्हटले आहे. तसेच, गुजरातला नेलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात परत यायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची यात्रा सुरु झाली तेव्हापासून भाजपमध्ये अस्वस्थता सुरु झाली, तेव्हापासून काँग्रेस आमदाराच्या फुटीच्या अशा बातम्या पसरवल्या जात आहे. झारखंड आणि बिहारमध्ये आमदार विकत धेण्याचे प्रयत्न सुरु आहे. लोकशाही विकत घेण्याचं काम भाजप करत आहे, पण गोव्याबाबत मला काही माहित नाही, अशी प्रतिक्रीयाही त्यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in