काँग्रेस अक्कलशून्य अन् मोदी-शहांपुढे शरण गेलेला पक्ष : आंबडेकरांची सणसणीत टीका

Congress | VBA | Prakash Ambedkar | : उमेदवार निवडण्यातच विरोधकांची चूक झाली
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

मुंबई : भारतात उद्या राष्ट्रपतीपदासाठी (Presidential Election) मतदान होणार आहे. उद्या सकाळपासून संसदेत आणि प्रत्येक राज्याच्या विधानभवनात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भाजपप्रणित एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसप्रणित युपीएकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना उमदेवरी देण्यात आली आहे. भाजप आणि मित्रपक्षांकडे दोन्ही सभागृह आणि राज्य विधानसभांमधील संख्याबळामुळे मुर्मू यांचे पारडे जड मानले जात आहे. (Presidential Election of india l Latest News)

याशिवाय शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा या काँग्रेससोबत असलेल्या पक्षांनीही आदिवासी या मुद्द्यावर मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा यांचे स्वंतत्र विचार मान्य करत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्ष आणि नेतृत्वावर निशाणा साधला आहे. काँग्रेस हा अक्कलशून्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासमोर शरण गेला आहे, अशी अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्यातच विरोधकांची चूक झाली आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी माझ्याकडे एकही मत नाही. पण सध्या काँग्रेस पक्षाकडून दिवाळखोरीचं राजकारण सुरू आहे. त्यांना विचार नाही. हा पक्ष अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर पूर्णपणे शरण गेला आहे.

याआधीही मी म्हणालो होतो की राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडत असताना तो आदिवासी वर्गातला असला पाहिजे. माझी ही भूमिका मी विरोधी पक्षाला कळवली होती. एकीकडे हे स्वत:ला विचारांचे ठेकेदार समजतात. पण दुर्दैवाने ते अक्कलशून्य आहेत. आज भाजपाने एक आदिवासी उमेदवार दिला, पण आपल्याला देता आला नाही, हे मोठ्या मनाने मान्य करणे ही दानत ज्यांच्याकडे नाही. त्यांनी इतरांवर टीका करू नये.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in