महापालिका निवडणुका जूनमध्ये..; निवडणूक आयोगाने मागवला अहवाल

रखडलेली निवडणूक घेण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे, तीनचा प्रभाग असणार आहे.
महापालिका निवडणुका जूनमध्ये..; निवडणूक आयोगाने मागवला अहवाल
Vasai-Virar City Municipal Corporationsarkarnama

विरार : 'मुदत संपलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका लवकर जाहीर करा,'असा आदेश न्यायालयाने दिला आहे. आता निवडणुकीच्या कामाला वेग आला आहे. वसई विरार महानगर पालिकेकेची निवडणूक (Vasai Virar Municipal elections) गेल्या दोनवर्षा पासून रखडली आहे. हि निवडणूक जून मध्ये होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी तीनचा प्रभाग असणार , यावर शिक्का मोर्तब झाले असून वसई विरार महानगर पालिकेत १२६ नगरसेवक असतील.

वसई विरार महानगरपालिकेची मुदत 2020ला संपली आहे. पालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. 2021 मध्ये रखडलेली निवडणूक घेण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली होती, या ठिकाणी ३ चा प्रभाग रचना हि करण्यात आली होती.

त्यावरील हरकती आणि सूचना मागविण्यात येऊन त्याची सुनावणी हि झाली. त्याचा अहवाल येण्यापूर्वीच राज्य सरकारने ओबीसी शिवाय निवडणुका नको असे सांगत कायदा केल्याने निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती.

Vasai-Virar City Municipal Corporation
राज ठाकरेंना भाजपच्या एका खासदाराचा विरोध, तर दुसरे खासदार स्वागतासाठी सज्ज

तर या ठिकाणच्या मतदार याद्या प्रभाग रचणे नुसार करण्यात आल्या होत्या, त्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम बाकी आहे. ते काम लवकरच होणार असल्याने निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची तयारीत आहे.

आज निवडणूक आयोगाने वसई विरार पालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणुकीला स्थगिती मिळाली होती, त्यापूर्वीच्या प्रभाग रचना, त्यावरील हरकती आणि सूचना , घेण्यात आलेली सुनावणी व मतदार याद्या या बाबतचा अहवाल घेऊन उपस्थित राहण्यास सांगितले आहे. आज वसई विरार महानगरपालिके बरोबरच नवी मुंबई,कोल्हापूर,उल्हासनगर,या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही बोलविण्यात आले आहे.

Vasai-Virar City Municipal Corporation
विलासराव आज असते तर, या भाजप आमदाराच्या प्रश्नावर धीरज देशमुख म्हणाले...

नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये मात्र उत्साह असल्याचे दिसत नाही. निवडणुकीसाठी त्यांनी कोव्हीड, आणि इतर सणाच्या वेळी प्रभागात मोठ्या प्रमाणत खर्च केला होता.परंतु निवडणुका सतत पुढे गेल्याने तो वाया गेला होता. त्यामुळे जोपर्यंत निवडणुकीची तारीख जाहीर होत नाही तोपर्यंत काही बोलायचे नाही, असे धोरण त्यांनी अवलंबिले आहे.

इतर मागासवर्गीयांच्या (OBC) आरक्षणाशिवाय निवडणुका कशा घ्यायच्या? हा मोठा पेच सध्या महाविकास आघाडी सरकारसमोर निर्माण झाला आहे. हा पेच असताना जरी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला तरी पावसाळा संपेपर्यंत निवडणुका घेणं शक्य नसल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

नवीन प्रभाग रचनेचा प्रश्न लवकर मार्गी लागणे शक्य नाही, त्यामुळे जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका होण्याची शक्यता आहे. "या निवडणुका 2020 च्या जुन्या प्रभागरचनेनुसार घेतल्या जाव्यात. येत्या दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा," असे आदेश सुप्रीम कोर्टाने नुकतेच दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.